• Sat. Sep 21st, 2024

हॅलो, लोहगावात मोठा स्फोट झालाय! पोलिसांना फोन; माहिती विचारातच फोन बंद, पुण्यात नेमकं काय घडलं?

हॅलो, लोहगावात मोठा स्फोट झालाय! पोलिसांना फोन; माहिती विचारातच फोन बंद, पुण्यात नेमकं काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, पुणे येरवडा: वेळ सकाळी सव्वा नऊ वाजताची… ‘हॅलो, हॅलो… लोहगावमध्ये मोठा स्फोट झाला आहे,’ असा कॉल पोलिस नियंत्रण कक्षाला येतो. नियंत्रण कक्ष लगेचच विमानतळ पोलिसांना घटनेची आणि मोबाइल क्रमांकाची माहिती देतात. बीट मार्शल पोलिसांकडून संबंधित मोबाइलवर संपर्क साधून माहिती घेत असताना अचानक फोन बंद होतो. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होतात. मात्र, चौकशी केल्यावर बांधकाम मजुराच्या सात वर्षांच्या मुलाने आईला संपर्क साधण्याऐवजी चुकून पोलिस नियंत्रण कक्षाला फोन लावल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, फोनमुळे विमानतळ पोलिसांची गेल्या आठवड्यात चांगलीच दमछाक झाली होती.

कोण आहे हा मुलगा?
लोहगाव येथील पोरवाल रस्ता परिसरात ‘न्याती’ बांधकाम व्यावसायिकाचा लेबर कॅम्प आहे. कॅम्पमध्ये जवळपास सगळे मजूर परराज्यांतील आहेत. रविवारी सकाळी या लहान मुलाचे आई-वडील कामाला गेले होते. मुलगा घरी एकटाच थांबत असल्याने आई तिचा मोबाइल त्याला देऊन कामाला जाते. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास परिसरात मोठा आवाज आल्याने मुलगा घाबरून गेला.

पुण्यात भर दिवसा भर रस्त्यात तरुणीवर कोयत्याने वार, २ तरुणांमुळे सुदैवाने वाचले प्राण

चुकून लावला ‘११२’
घरात एकटाच असलेल्या मुलाने घाबरत मावशी आणि आईशी संपर्क साधण्याऐवजी ११२ क्रमांक डायल केला. ‘लोहगावात मोठा स्फोट झाला आहे,’ असे सांगून त्याने फोन कट केला. त्यामुळे नियंत्रण कक्षाने लगेचच विमानतळ पोलिसांना घटनेची आणि मोबाइल क्रमांकाची माहिती दिली. विमानतळ पोलिस ठाण्याच्या बीट मार्शल पोलिसांनी मुलाच्या मोबाइलवर संपर्क साधून पोलिस बोलत असल्याचे सांगितले. मात्र, ते स्फोटाची माहिती विचारू लागताच मुलाने घाबरून मोबाइल बंद केला. त्यामुळे पोलिस संभ्रमात पडले.

तपासाचे आव्हान:
लोहगावात खरेच स्फोट झाला, की कोणी फेक कॉल केला, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने चार तास तपास केला आणि दुपारी दीड वाजता घटनास्थळी दखल झाले. पोलिस निरीक्षक संगिता माळी, सहायक निरीक्षक विजय चंदन, उपनिरीक्षक विजय ढावरे आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Pune Koyta Gang: जिथे दहशत माजवली, तिथेच पोलिसांनी जिरवली; पुण्यातील डॅनी गँगची धिंड; Video

अखेर उलगडा:
लेबर कॅम्प मोठा असल्याने आणि मोबाइल बंद लागत असल्याने पोलिसांनी त्या मोबाइल क्रमांकाचा तपास प्रत्येकाकडे सुरू केला. अखेर मोबाइलवरून एका सात वर्षांच्या मुलाने पोलिसांना चुकून फोन केला असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी मुलाला आणि त्याच्या आई-वडिलांना पोलिस ठाण्यात नेऊन कडक शब्दांत समज दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed