• Mon. Nov 25th, 2024
    शाळेच्या उपमुख्याध्यापिकेने चक्क भाजप आमदारांनाच दिला दम; म्हणाल्या, तुमच्यात हिंमत…

    ठाणे: उल्हासनगरच्या न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेने यावर्षी ३ पट फी वाढ केल्याने पालक वर्ग चिंतेत आहे. त्यांनी याप्रकरणाची भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर आमदार गायकवाड यांनी या शाळेच्या प्रशासनाची भेट घेत त्यांना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळेत गेलेल्या आमदारांना उपमुख्याध्यापिकांनी तुमच्यात हिंमत नाही का एकट्याने बोलण्याची असा दम दिला.
    गोवंश हत्येने गावात संताप, रागाच्या भरात दोघांना बेदम मारहाण, मॉब लिंचिंगच्या घटनेनं खळबळ
    आमदार आणि उपमुख्याध्यापिकांमध्ये झालेल्या वादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. या वेळेत आमदार गायकवाड यांच्यासोबत काही पालक उपस्थित होते. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका यांनी तुमच्यासोबत आलेल्यांना बाहेर पाठवा. तुमच्या एकट्यामध्ये बोलण्याची हिंमत नाही, का असा दम चक्क भाजप आमदारांनाच दिला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी या उपमुख्याध्यापिकेला चांगलेच धारेवर धरत खडसावलं आहे.

    सोलापुरातील एका अपार्टमेंटमध्ये माकडाचा उच्छाद; घरात शिरून थेट फ्रीजमधील पदार्थांवर ताव

    यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले आहे. दरम्यान एका लोकप्रतिनिधीशी शाळा प्रशासन अशा प्रकारे वागत असेल तर पालक वर्गाशी ते कसे बोलत असतील, याचा विचार करा असा सवाल आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असून शाळा प्रशासनाने अयोग्य पद्धतीने फी वाढ केल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed