• Sat. Sep 21st, 2024
शेतकऱ्यांना दिलासा! नांदेडच्या केळीला २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर

नांदेड: नांदेड जिल्ह्यात एकीकडे पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आता नांदेडच्या केळीला २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. तीन महिन्यांपूर्वी केळीचे दर प्रति क्विंटल अडीच हजार रुपयांवरून ५०० रूपयांवर आले होते. त्यामुळे या चिंताग्रस्त झालेल्या केळी उत्पादकांना आता दिलासा मिळाला आहे.
अजित पवार सरकारमध्ये आले अन् महाराष्ट्राने असं काही केले जे आजवर देशात कधीच झाले नाही
केळी उत्पादनात राज्यात जळगावनंतर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचा क्रमांक लागतो. नांदेडसह शेजारील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही भाग असे जवळपास १५ हजारांपेक्षाही अधिक हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. विशेष म्हणजे नांदेडमधील अर्धापूरची केळी प्रसिद्ध असून केळीला देशविदेशात मोठी मागणी असते. दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात वादळी वारा तसेच गारपिटीमुळे अर्धापुर आणि मुदखेड तालुक्यातील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले होते.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आस्मानी संकटाने हिरावून घेतला होता. त्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यांपासून प्रति क्विंटल अडीच हजार रुपयांपर्यंत गेलेले केळीचे दर ५०० ते ६०० रुपयांवर आले होते. भाव घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. आता केळीला २२०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. केळीचे दर पूर्ववत होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अर्धापूर तालुक्यातील केळी प्रसिद्ध आहे. देश विदेशा पर्यंत अर्धापूरच्या केळीला मागणी असते.

एपीएमसी मार्केटमध्ये किळसवाणा प्रकार! भाजी विक्रेत्या महिलेने चक्क सांडपाण्यात धुतली कोंथिबीर

दरवर्षी आखाती देशात केळीची निर्यात केली जाते. इराण, इराक, दुबई यासह इतर देशात केळी पाठवली जातात. गतवर्षी पाकिस्तानला केळीची निर्यात करण्यात आली होती. मात्र अवकाळी पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाल्याने देश विदेशातील निर्यात प्रक्रिया थांबली होती. आता पुन्हा इराक, इराणसह अन्य देशात केळी निर्यात करण्यात आली आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून केळीचे दर घसरले होते. आता पुन्हा दर वाढण्यास सुरूवात झाली आहे. पुढील काही दिवस सण उत्सवाला सुरुवात होणार असल्याने केळीची मागणी वाढणार आहे. त्यामुळे केळीचे दरही ३००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed