• Sat. Sep 21st, 2024

राष्ट्रपतींचं स्वागत करुन मुख्यमंत्री तातडीने नागपूरहून मुंबईला रवाना, पुन्हा राजकीय स्फोट?

राष्ट्रपतींचं स्वागत करुन मुख्यमंत्री तातडीने नागपूरहून मुंबईला रवाना, पुन्हा राजकीय स्फोट?

गडचिरोली : देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवार दि.५ जुलै रोजी गडचिरोलीत येणार आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीत जिल्ह्यात येणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरणार आहे. आज संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपती मुर्मू यांचं नागपूर विमानतळावर आगमन झालं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्याबरोबर राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. स्वागतानंतर मुख्यमंत्री तडकाफडकी नागपूरहून मुंबईकडे रवाना झाले. दादांच्या एन्ट्रीने खातेवाटपावरुन अनेक मंत्र्यांमध्ये धुसपूस आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते खाती सोडायला तयार नसल्याची माहिती आहे. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्याचमुळे मुख्यमंत्री तडकाफडकी नागपूरहून मुंबईला आल्याची चर्चा आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त चालवलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज मंगळवारी ४ जुलैला सायंकाळी साडे सात वाजता नागपुरात आगमन झाले. ५ जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे.

राष्ट्रपतींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा बंदोबस्तासाठी तब्बल दिड हजार पोलीस अधिकारी व अंमलदारांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेला एक हजार आसनक्षमतेचा सभामंडप वातानुकूलित राहणार आहे. विद्यापीठ मार्गावरील रस्त्यांचे युद्धपातळीवर नव्याने डांबरीकरणही करण्यात आले. सकाळी १०.३० ते ११.३० अशा अवघ्या एक तासाच्या या दौऱ्यात राष्ट्रपती गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.

तेथूनच त्या अडपल्ली-गोगाव येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेचे रिमोट कंट्रोलने अनावरण करतील. राष्ट्रपतींसाठी खास पुणे येथून दोन बुलेटप्रुफ गाड्या गडचिरोलीत दाखल झाल्या आहेत. हेलिपॅड ते कार्यक्रम स्थळापर्यंत आणण्यासाठी राष्ट्रपतींच्या ताफ्यात 35 वर वाहने राहतील. त्यात वैद्यकीय पथक, बाईल जॅमरचाही समावेश असेल.

दौऱ्याच्या बंदोबस्तात १५१ पोलीस अधिकारी, ६३९ पुरुष व महिला अंमलदार, ८ एसआरपीएफ प्लाटुन, ११ सी-६० पथके, वायरलेस, मोटार परिवहन विभाग व इतर असे मिळून १५०० अधिकारी/अंमलदार तैनात राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed