• Sat. Sep 21st, 2024
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सर्वत्र बरसला पाऊस, कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

मुंबई : राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून आता सर्वत्र पोहोचला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह सर्व महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले आहे. आताही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून आज अनेक भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. अशात हवामान विभागाने आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर तर विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Monsoon Update: राज्यात पुढचे ३ दिवस पाऊस कोसळणार, या ४ भागांना IMD कडून अतिवृष्टीचा इशारा
खरंतर, राज्यात पुढील ४ ते ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. मुंबईच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ५ जुलैपर्यंत उत्तर-दक्षिण कोकण, गोवा आणि पूर्व-पश्चिम विदर्भात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. तर इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल तर घाटमाथावर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल.

दरम्यान, संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. दरवर्षी साधारणपणे संपूर्ण भारतात ८ जुलैच्या आसपास मान्सून दाखल होतो. पण यावर्षी मात्र आधीच संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झालं आहे तर आज कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पंजाबराव डख यांचे हवामानाचे अंदाज खरे ठरतात का? त्यांच्यावरचे आक्षेप काय ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed