मोहिते पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, अजित पवार यांनी आम्हाला तिथे बोलावले. अधिवेशनाबाबत चर्चा करायची म्हणून तिकडे बोलावले. मात्र शपथविधी संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा आजच शपथविधी होणार आहे, याबाबत काहीही कल्पना दिली नाही. एका कागदावर आमच्या सह्या घेतल्या आणि आम्हाला सांगितले की आता आपल्याला शपथ घ्यायची आहे. आम्ही तिथे गेल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते तिथे आले त्यामुळे आमचा समज झाला की, अजित पवार जी भूमिका घेतात, ती वरिष्ठांची देखील असेल. मात्र ज्यावेळी शपथ विधीला गेलो तिथे सुप्रिया ताई सोडून सर्व नेते उपस्थित होते.
मी टीव्हीवर पाहिले की, शरद पवार वेगळी भूमिका मांडतात. अजित पवार वेगळी भूमिका मांडतात. अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार यांचे कुठलेही समर्थन नाही, त्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत. ज्या लोकांमुळे पक्ष अडचणीत आला त्यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ असो यांच्यमुळे पक्ष अडचणीत आला. त्यामुळे त्यांच्यासोबत पुन्हा काम करायचं का असा प्रश्न आमच्या मनात आहे.
त्यामुळे आम्ही सगळे आमदार अस्वस्थ झालेलो आहोत. त्यामुळे भाकरी कधी फिरवणारच नाही का? बाकीच्या लोकांना संधी देणारच नाही का? जे साहेबांनी केलं तेच अजित पवार करताहेत का? साहेबांनी कधी आमच्यावर विश्वास ठेवलाच नाही. त्यामुळे अजित पवार जर तोच निर्णय घेणार असतील तर आम्हाला आमच्या जनतेत जावे लागेल. जनता काय म्हणते ते पाहावं लागेल. या सर्व गोष्टींचा विचार करून मी माझा निर्णय घेणार असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले आहे.