• Sun. Sep 22nd, 2024

प्रतिक्षा संपली! लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो; आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी

प्रतिक्षा संपली! लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो; आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी

पुणे : पावसाळा चालू झाली की पर्यटकांची पाऊले आपोपाप लोणावळ्याकडे वळतात. दरवर्षी हजारो पर्यटक या हिलस्टेशनला पावसाळ्यात भेट देत असतात. पावसाळ्यात ट्रेकिंग, कॅम्पिंग करणारे आणि खळखळून वाहणारे धबधबे पाहायला मिळतात. लोणावळ्यात कार्ला लेणी, भुशी डॅम, भाजा लेणी, राजमाची किल्ला, आंबी व्हॅली अशी पर्यटकांना आकृष्ट करणारी ठिकाणे आहेत.

मागील काही दिवसांपासून पुणे शहराबरोबरच पुण्याजवळील परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे लोणावळा परिसरातील डोंगररांगा हिरवाईने नटल्याचे पाहायला मिळत आहेत. पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले भुशी धरणही अखेर ओसंडून वाहू लागले आहे. गेली आठवडाभर परिसरात वरुणराजाने कृपादृष्टी केल्याने पर्यटकांची प्रतीक्षा आता संपली आहे. त्यामुळे लोणावळ्यातील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सुळका सर करण्यासाठी गेलेले पुण्यातील तरुण रात्री जंगलात रस्ता चुकले; शिवदुर्ग रेस्क्यू टिममुळे सुखरुप सुटका

थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. या पावसाने इथला निसर्ग अक्षरशः नटून गेलाय. सह्याद्रीच्या पर्वत रांगा धुक्यात हरवल्या आहेत. पावसाच्या संततधारीमुळे छोटे छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. आता निसर्ग इतका बहरल्याने पर्यटक आणि ट्रेकर्स तरुण, तरुणींनी लोणावळ्यातील परिसर फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. विक एंड साजरा करण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात गर्दी करू लागले आहेत.

Pune News: पावसात जंगल सफारीचा मोह आला अंगलट; चार इंजिनिअरिंगचे तरुण चुकले वाट अन्…
काही पर्यटक वर्षानुवर्षे लोणावळ्याला भेट देत असून भुशी धरणाच्या ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत. दुसरीकडे, नागरिकांनी जरूर पावसाचा आनंद घ्यावा, मात्र, आनंद घेत असताना आपल्या जीवाला धोका होईल असे वर्तन करू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Buldhana Bus Accident: विदर्भ ट्रॅव्हल्सच्या त्या बसमधून कोण कोण प्रवास करत होतं, प्रवाशांची यादी समोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed