• Mon. Nov 25th, 2024
    बुलढाणा अपघातातील मृतदेहांची ओळख पटलीच नाही, नातेवाईकांचा अंत्यसंस्काराबात महत्त्वाचा निर्णय

    बुलढाणा: बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला . त्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. बसला आग लागल्यामुळे सर्व मृत प्रवाशी मोठ्याप्रमाणावर आगीत होरपळले होते. त्यामुळे त्यांच्या मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा आणि मृतांच्या नातेवाईकांकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमच्या माहितीनुसार, सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यासाठी पाच दिवस लागतील. एवढा काळ न थांबता रविवारी सकाळीच सर्व मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

    गिरीश महाजन यांनी म्हटले की, २५ मृतदेह याठिकाणी आहेत. त्यांचे २० ते २१ नातेवाईक याठिकाणी आले आहेत. चार नातेवाईक हे लवकरच याठिकाणी पोहोचतील, ते सध्या रस्त्यामध्ये आहेत. तास-दोन तासामध्ये तेदेखील याठिकाणी येतील. सगळ्या मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अनेक मृतदेह अर्धवट जळाले आहेत, कोणाचा चेहरा ओळखू येत नाही, अशी खूप वाईट परिस्थिती झाली आहे. मी सांगू शकत नाही इतक्या वाईट परिस्थितीत मृतदेह असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. सगळ्या नातेवाईकांनी हे मृतदेह बघितले आहेत. आता या मृतदेहांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे अशा सर्व ठिकाणांहून फॉरेन्सिक कर्मचाऱ्यांची पथकं बुलढाण्यात दाखल झाली आहेत. आम्ही मृतांच्या नातेवाईकांसमोर फॉरेन्सिक टीमला विचारलं की, मृतदेहांची ओळख पटवायला नेमका किती वेळ जाईल? त्यांनी सांगितले की, २४ तास काम केले तरी सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी किमान पाच दिवस तरी लागतील. सगळ्या मशिन्स वापरल्या तरी इतका वेळ लागेल. इतके दिवस हे सर्व मृतदेह जळालेल्या अवस्थेत तसेच ठेवून द्यावे लागतील. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, नातेवाईकही त्याला तयार आहेत, त्यानुसार या सर्व मृतदेहांवर सामूहिकरित्या दाहसंस्कार करण्यात येतील. आणखी काही नातेवाईक आल्यानंतर त्यांनाही आम्ही विचारू, तेही याला होकार देतील. त्यामुळे रविवारी सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास सगळेजण एकत्र येऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतील, अशी माहिती गिरीश महाजन यांनी सांगितले.

    जेवण ठरलं अखेरचं! अपघातग्रस्त बसचं वाशिममधील CCTV फुटेज समोर; काही तासांत अघटित घडलं

    समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात बस चालकावर गुन्हा दाखल

    बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे झालेल्या खाजगी बस लक्झरी अपघातात २५ जण मृत्युमुखी पडले, तर आठ जण जखमी झाले . या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या खाजगी बस विदर्भ ट्रॅव्हल्सच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यावर विविध कलमाने सिंदखेडराजा पोलीस स्टेशन मध्ये मोटर वाहन कायदा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाता बाबत १४०/२३ , २७९, ३०४ ,३३७, ३३८, ४२७ मोटर सायकल ॲक्ट १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    समृद्धी महामार्गावरील अपघाताआधी विदर्भ बस यवतमाळला थांबली तेव्हाची दृश्य

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *