• Mon. Nov 25th, 2024
    १.२० मिनिटांनी बहिणीशी फोनवर बोलला, १.२२ वाजता बसला अपघात, भाऊराया गेला; चटका लावणारी कहाणी

    नागपूर: विदर्भ ट्रॅव्हल्सची बस नागपूरहून दुपारी निघाल्यानंतर रात्री कारंजा येथे थांबते. ती मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी ही बस पुण्याच्या मार्गाने सुटते. बेसा येथे राहणारा कौस्तुभ काळे यावेळी त्याच्या बहिणीशी फोनवर बोलत होता. संभाषणादरम्यान कौस्तुभने सकाळी पुण्यात आल्यानंतर फोन करतो असं बहिणीला सांगून फोन ठेवला. दोन मिनिटांनी म्हणजेच १.२२ मिनिटांनी त्याच बसला अपघात झाला. या अपघातात कौस्तुभचा होरपळून मृत्यू झाला.

    भाऊ पुण्याला पोहोचला असावा, म्हणून सकाळी कौस्तुभच्या बहिणीने त्याला फोन केला. पण, त्याचा फोन लागत नव्हता. बराच वेळ झाला पण त्याचा फोन लागत नव्हता, तेव्हा अस्वस्थ झाली. दुसरीकडे, टीव्ही सुरू होताच नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाला असून त्यात बसमधील २५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची असल्याची माहिती मिळाली. हे ऐकून बहिणीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती लगेच घटनास्थळी रवाना झाली.

    दत्तक घेतलेल्या लेकीला घेऊन प्रवासाला निघाले, बुलढाणा अपघातात लहानग्या ओवीसह आई-आजीचा मृत्यू
    एकुलता एक भाऊ, घरातील कमावता होता कौस्तुभ

    बेसा परिसरात राहणारा कौस्तुभ काळे हा नागपुरातील एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला होता. कौस्तुभ हा एकुलता एक भाऊ आणि दोन बहिणी. आई-वडील वृद्ध आहेत. त्यामुळे घरची सगळी जबाबदारी त्याच्यावरच होती. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असताना, चांगली नोकरी मिळावी म्हणून तो एका खाजगी कंपनीत मुलाखतीसाठी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतो.

    समृद्धी महामार्गावरील अपघाताआधी विदर्भ बस यवतमाळला थांबली तेव्हाची दृश्य

    शुक्रवारी आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन बहिणीला सांगून तो बैद्यनाथ चौकातून विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये चढला. अपघातापूर्वी कौस्तुभ त्याच्या कुटुंबीयांशी आणि बहिणींशी फोनवर बोलले. मात्र, ट्रॅव्हल्स बसला अपघात झाल्याची बातमी शनिवारी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच कौस्तुभची मोठी बहीण बुलढाण्याकडे रवाना झाली आहे.

    लाडकी लेक पुण्याला निघाली, अपघाताचं समजताच माऊलीचा एकच टाहो; म्हणाली, मला तिच्याकडे घेऊन चला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *