मुंबई, दि. 1 – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पिंपळखुटा येथे खासगी बसला अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हृदय पिळवटून टाकणारे आहे. दुर्घटनेतील सर्व मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या तीव्र शोकसंवेदना मृतांच्या आप्तेष्टांना कळवतो. या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना लवकर बरे वाटावे, ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.
000
Governor expresses grief over accident in Buldhana Dist
Maharashtra Governor Ramesh Bais has expressed grief over the death of passengers in a road accident in Buldhana district. In a condolence message, the Governor said:
“The news of the death of passengers travelling on a private bus in a road accident on the expressway in the Buldhana district is heart-wrenching. I offer my homage to those who lost their lives and convey my deepest condolences to the next of the deceased. I pray for the quick recovery of the injured.”