• Sat. Sep 21st, 2024

आषाढी एकादशीला उपवासाच्या रताळ्यावर संक्रांत, भाव वाढले अन् व्यापारी चिंतेत सापडले

आषाढी एकादशीला उपवासाच्या रताळ्यावर संक्रांत, भाव वाढले अन् व्यापारी चिंतेत सापडले

नवी मुंबई : आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळ्याची आवक झाली. मात्र, यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली असल्याने उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी असल्याने आषाढी एकादशीला रताळ्याचे भाव वाढले.

मागील दोन दिवसांपासून आलेल्या आवक पेक्षा आज कमी गाड्या बाजार समितीत आल्या. तरीही ग्राहक नसल्याने व्यापारी चिंतेत सापडला आहे. बेळगाव, मंचरवरून रोज वीस ते पंचवीस गाड्यांची आवक होते. आज तिच आवक दहा गाड्यांवर आली आहे. मात्र, ग्राहक खूप कमी आहेत. दोन दिवसांपूर्वी दोनशे रुपये किलोला विकले जाणारे रताळे आज अडीचशे रुपये किलो झाले आहे. आवक कमी असतानाही रताळे पडून आहेत.
परराज्यांतील रंगीबेरंगी फळांनी बाजार सजला; बिहारच्या लिचीपासून ते काश्मीरच्या चेरीपर्यंत…
आषाढी एकादशी ही वर्षातून एकदाच येते. त्यामुळे विठ्ठल भक्त ह्या दिवशी आवर्जून उपवास करतात. मग ह्या दिवशी उपवासाला साबुदाणे आणि रताळे आवर्जून खाल्ली जातात. मात्र ह्या वर्षी सततच्या होणाऱ्या पावसामुळे मोठ्या संख्येने नागरिक मार्केटमध्ये आले नाहीत. त्यात काही रताळे हे आकाराने खूप मोठी असल्यामुळे आलेल्या ग्राहकांनीही पाठ फिरवली. जी रताळी रंगाने लाल आहेत, त्यांना थोडेफार ग्राहक पसंती देतात.
Tomato Rate: टोमॅटोची पेट्रोल भावात विक्री पण शेतकऱ्यांना मिळतोय इतका दर..बाजारात काय घडतंय
मार्केटमध्ये माल तसाच पडून असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यामुळे त्यांना पैसे देणे भाग असते. इकडे मार्केटमध्ये आणलेल्या मालाला ग्राहक घेत नसल्यामुळे आहे त्या परस्थिमध्ये माल तसाच जागेवर पडल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रताळे खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे माल जागेवर तसाच पडून असल्याचे व्यापारी संपत भैये यांनी सांगितले.

टोमॅटोने गाठली शंभरी; १०० ते १२० रु किलोनं विकला जात असल्यामुळे नागरिकांना महागाईचा चटका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed