• Sat. Sep 21st, 2024
बकऱ्याची कुर्बानी देऊन विहिरीत पोहायला उतरले अन्… ईदच्या दिवशीच कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

पालघर: नालासोपारा येथे बकरी ईदच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली आहे. विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कुर्बानी देऊन हे तरुण घरी परतत असताना विहिरीवर पोहोण्यासाठी गेले होते. मात्र तेथे त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. सणाच्या दिवशीच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Bhandara News: शेळ्या मालकाविनाच घरी परतल्या, शोध घेताना रक्ताचा सडा दिसला, नरभक्षक वाघाला पकडण्यात यश
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेमधील तुळींज स्मशानभूमीजवळ असलेल्या अप्पानगर येथे ईद साजरी करण्याकरिता कुर्बानी देऊन अदनान शेख (२२) आणि अमान खान (१८) हे दोन तरुण आपल्या घरी परतले होते. त्यानंतर परिसरात असलेल्या विहिरीत पोहोण्यासाठी हे दोघेही तरुण भाऊ उतरले. मात्र विहीर खोल असल्याने मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही तरुण विहिरीत बुडाले. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.

बोटीनं तलावात गेले मात्र तिघं बुडाले,एक वाचला

माहिती मिळताच तुळींज प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यापैकी अदनान याला अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम विहिरीतून बाहेर काढले. तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही वेळाने अमान याचा मृतदेह देखील अग्निशमन दलाने विहिरीतून बाहेर काढला. अदनान आणि अमान या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घरातील तरुणांचा सणाच्या दिवशीच असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed