गेल्या काही दिवसात आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये कपात झालेली माहिती प्रसार माध्यमांमध्ये आली होती त्यानंतर गृह खात्याकडून ठाकरे कुटुंबीयांचा सुरक्षेमध्ये कपात करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले होते. सध्या आदित्य ठाकरे यांना पुरवण्यात आलेली सुरक्षा ही झेड दर्जाची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचे एक वाहन असते त्यात एक अधिकारी आणि चार कर्मचारी असल्याची माहिती आहे. ठाकरे कुटुंबीयांना अशा प्रकारची सुरक्षा देणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न शिवसैनिक उपस्थित करत आहेत.
मातोश्रीसह ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली होती परंतु गृह खात्याकडून आलेल्या माहितीनुसार ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा जशास तशी असल्याची माहिती देण्यात आली. ठाकरे कुटुंबीयांची सुरक्षा कायम ठेवली असते तर मातोश्री बाहेरील SRPF रक्षकांना देखील हटवण्यात आले आहे. मातोश्री परिसरात असणारी मुंबई पोलिसांची सुरक्षा देखील काढण्यात आलेली आहे या अपघाता नंतर आदित्य ठाकरे यांना अतिरिक्त सुरक्षा आणि वाहन सरकार देणार का, असा सवाल समस्त शिवसैनिकांना पडला आहे.