• Mon. Nov 11th, 2024

    माझ्या मामाला वाचवा हो.., याचना करणाऱ्या भाचीनेही जीव गमावला, एक निर्णय अन् सारं संपलं

    माझ्या मामाला वाचवा हो.., याचना करणाऱ्या भाचीनेही जीव गमावला, एक निर्णय अन् सारं संपलं

    गडचिरोली: तालुका मुख्यालयात असलेल्या महाविद्यालयात पदवी प्रवेश घेण्यासाठी दुचाकीवर जाताना दुचाकीची झाडाला धडकल्याने मामा भाची दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावा जवळ घडली. नथ्थू पुस्सु हिचामी (वय २५, रा.जिवनगट्टा) असे मामाचे तर रोशनी बंडू पदा (वय २२ रा.पिपली बुर्गी) असे भाचीचे नाव आहे.

    नथ्थू पुस्सु हिचामी हा काही कामानिमित्त बहिणीच्या घरी पिपली (बुर्गी) गावात गेला होता. तो काम आटोपून आपल्या गावी जीवनगट्टा येथे परत येण्याकरिता निघाला असता नथ्थूची चुलत भाची रोशनीला एटापल्ली तालुका मुख्यालयातील एका महाविद्यालयात पदवीचे प्रवेश घ्यायचे असल्याने ती आपल्या मामासोबत त्याच्याच दुचाकीवरुन निघाली. पिपली बुर्गीवरून निघाल्यानंतर गावाजवळून जवळपास चार किलोमीटर अंतरावर वेलमागड गावाजवळ दुचाकीची झाडाला धडक बसली या अपघातात नथ्थूचा जागीच मृत्यू झाला.

    अंधश्रद्धेपायी ३ दिवसांची लेक मायेला मुकली, ताप आल्याने बाबाकडे नेलं अन् अनर्थ घडला
    रोशनी गंभीर जखमी झाली होती. मामाला रुग्णालयात नेण्यासाठी भाची या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना विनवणी करत होती. मात्र, मामाचा जागीच मृत्यू झाला होता. रोशनीला पिपली बुर्गी गावात नेले असता उपचारादरम्यान काही वेळात तिचाही मृत्यू झाला. या अपघातात मामा आणि भाची दोघांचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. नथ्थूचे शिक्षण बारावी पर्यंत झाले होते. तर, रोशनी ही बारावी उत्तीर्ण झाली होती. तिला पुढचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र, तिचे स्वप्न अपूर्णच राहिले.

    नाशिकमधील पेठ महामार्गावर एसटी अन् सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात

    एटापल्ली हा अतिदुर्गम व आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील बहुतांश भागात अजूनही मुख्य रस्ते, नदी-नाल्यावर पूल नसल्याने खेड्यापाड्यांत आजही एसटी बससेवा नाही. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी शिवाय पर्याय नाही.

    Pune Murder: दर्शनाची हत्या केल्यानंतर लपण्यासाठी काय-काय केलं, राहुलचा प्लान ऐकून पोलिसही चक्रावले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed