• Mon. Nov 25th, 2024

    Sambhajinagar News: पहिल्याच पावसात उडाली दाणादाण; वसाहतींमध्ये पाणी शिरले, मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा

    Sambhajinagar News: पहिल्याच पावसात उडाली दाणादाण; वसाहतींमध्ये पाणी शिरले, मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा

    Chhatrapati Sambhajinagar News : महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बुढीलेन, जुनाबाजार भागातील वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरले, यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.

     

    पहिल्याच पावसात उडाली दाणादाण
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मंगळवारी झालेल्या पहिल्याच पावसाने दाणादाण उडवली. महापालिकेचा कारभार उघडा पाडला. रस्ते जलमय झाले तर अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले,त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.मोठ्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी (२७ जून) शहरात सायंकाळी चारच्या सुमारास मोठा पाऊस झाला. वीस ते पंचेवीस मिनीटे कोसळलेल्या या पावसाने पालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचा बुरखा फाडला. रस्त्यंवर, वसाहतींमध्ये पावसाचे पाणी साचणार नाही या दृष्टीने आवश्यक ती मान्सूनपूर्व कामे करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते, परंतु या अधिकाऱ्यांना नालेसफाईवरच लक्ष दिले. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्ते जलमय झाले. बऱ्याच रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याचे चित्र होते. प्रामुख्याने भाजीवाली बाई पुतळा ते उत्सव मंगल कार्यालय या रस्त्यावर तीन ठिकाणी पाणी साचले होते. औरंगपुरा बसथांबा, पीर बाजार, जुनाबाजार, बुढीलेन, लेबरकॉलनी, हर्षनगर यासह अनेक भागात आणि रस्त्यांवर पाणी साचले होते.
    नाल्यातून फ्रीज, कपाट, पलंग आले वाहत; अंधेरी सब वे तुंबण्यावरुन BMC चं कारण
    ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून रस्त्यांची कामे केली जात आहेत. ही कामे करताना रस्त्यांमध्ये येणारा पुलांचा भाग तसाच सोडून देण्यात आला आहे. रस्ता उंच आणि पुलाचा भाग खोल अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुलाच्या खोलगट भागात पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत होती.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *