• Sat. Sep 21st, 2024
Maharashtra Monsoon : राज्यावर पुढचे ३-४ अस्मानी संकट, मुंबई, पुण्यासह ७ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मान्सूनने यंदा उशिरा हजेरी लावली असली तरी सुरुवातीच्या हंगामातच तुफान पाऊस सुरू आहे. गेल्या ३ दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र मान्सून दाखल झाला असून आज आणि उद्या हवामान खात्याकडून राज्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांत, रायगड, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशात राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाणे आणि नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यासंबंधी आयएमडी मुंबईकडून इशारा देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या तीव्र ते अतितीव्र सरी पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर पुढील ३-४ तासांत जळगाव जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Monsoon Update : मान्सूनची जोरदार बॅटिंग, आज महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट; या भागांना अतिवृष्टीचा इशारा

राज्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट

दरम्यान, आज दिवसभरात नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्येदेखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान खात्याचा इशारा आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे २७ आणि २८ जून रोजी राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट असणार आहे तर महाराष्ट्रातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आगे. दरम्यान, २९ आणि ३० जूनला महाराष्ट्रात तुफान पाऊस होईल. पण यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.

Weather Alert : मुंबईसह राज्यात पुढचे २ दिवस अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट, आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

‘या’ भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

खरंतर, गेल्या २४ तासात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस बरसला. तर, आज मंगळवारीही मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह, पुणे, संपूर्ण कोकण, ठाणे, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि साताऱ्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भाच्या काही भागांतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईकर अन् ठाणेकरांनी प्रतीक्षा संपली; पावसाच्या सरी बरसल्या

मंगळवारी विदर्भातील अमरावती, नागपूर परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर भंडारा आणि गोंदिया भागात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात विदर्भात मेघगर्जनेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Crime Diary: जाताना दोघे येताना एकटाच, लग्नाचं प्रपोज, प्रेमभंग, झटापट अन् रक्तपात; दर्शना मर्डर केसबद्दल सगळं काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed