• Sat. Sep 21st, 2024
Bakri Eid Holiday : बकरी ईदची सुट्टी नेमकी कधी? राज्य सरकारच्या निर्णयाने घोळ मिटला

मुंबई : बकरी ईद किंवा ईद-अल-अजहानिमित्त बुधवारी जाहीर झालेली सुट्टी आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवार २९ जून रोजी बकरी ईदची सुट्टी असेल.

बकरी ईदनिमित्त महाराष्ट्र शासनाकडून बुधवार २८ जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु बकरी ईदचा सण गुरुवार, २९ जून रोजी येत असल्याने २८ जूनला देण्यात आलेली सुट्टी रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती.

माजी मंत्री अरिफ नसीम खान, काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष मुदस्सर पटेल यांनी शासनाकडे मागणी केली. मुस्लिम समुदायातील अनेक जणांनी त्यासंदर्भातील मागणी केल्याचं अरिफ खान यांनी म्हटलं आहे.

आमच्यासाठी हा दिवाळी-ईदसारखा आनंदाचा सण; ३२ वर्षांपासून मुस्लीम कुटुंब करतं वारकऱ्यांची सेवा

चंद्रदर्शनानुसार ईदची तारीख ठरते. सार्वजनिक सुट्टीत बदल केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांनी सुलभ होईल, असे मत पटेल यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार शासनाकडून यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे.

Pune News: माझ्याशी पाच मिनिटं बोल; तरुणीचा पाठलाग करत कोयत्याने वार; सदाशिव पेठेतील A टू Z स्टोरी
दरम्यान, २८ जून रोजी बकरी ईद निमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. तर काही राज्यांमध्ये २९ जून रोजी कोणतेही बँकिंग कामकाज होणार नाही.

नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग…; RTO अधिकारी विठुरायाच्या भक्तीत दंग, अभंग गात घेतला आनंद
ईद-अल-अधा किंवा बकरी ईदसाठी २९ जून रोजी बँक हॉलिडे असणारी शहरे कोणती? नवी दिल्ली, श्रीनगर, चंदिगढ, इंफाळ, जयपूर, अहमदाबाद, आगरतळा, बंगळुरु, ऐझॉल, पणजी, पाटणा, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, रांची, जम्मू, कोलकाता, लखनौ, शिलाँग, शिमला, भोपाळ, गुवाहाटी, कानपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed