• Sat. Sep 21st, 2024

ही दिल्ली नाही पुणे आहे…; तरुणाने रस्त्यात तरुणीवर वार करताच स्थानिक धावले अन् अनर्थ टळला!

ही दिल्ली नाही पुणे आहे…; तरुणाने रस्त्यात तरुणीवर वार करताच स्थानिक धावले अन् अनर्थ टळला!

पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आज पुन्हा एकदा शहरात भररस्त्यात एक धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने बाईकवर असणाऱ्या तरुणीवर कोयत्यावर वार केले. मात्र स्थानिक तरुणांनी मोठ्या धाडसाने हल्लेखोर विकृत तरुणाला पकडलं आणि तरुणीचा जीव थोडक्यात वाचला. काही दिवसांपूर्वी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही भररस्त्यात एका तरुणीवर निर्घृणपणे रस्त्यात वार करण्यात आले होते. तिथं उपस्थित असलेल्या जमावाने आरोपीला रोखण्याचं धाडस न दाखवल्याने त्या तरुणीचा मृत्यू झाला होता. मात्र पुण्यात दोन तरुणांनी जीवावर उदार होत तरुणीचे प्राण वाचवल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सदाशिव पेठ भागात आज सकाळी १० वाजण्यास सुमारास एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. ही तरुणी आणि एका तरुणासोबत दुचाकीवरून सदाशिव पेठ भागातल्या स्वाद हॉटेलच्या परिसरात आली होती. त्याठिकाणी ते दोघे एकमेकांशी बोलत बोलत असताना शंतनू जाधव हा तरुण तिथं आला आणि त्याने बागेतून कोयता काढत दुचाकीवर असणाऱ्या तरुण-तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दुचाकीवरील तरुण आपला जीव वाचवत तिथून पळून गेला आणि शंतनू जाधव याने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

टोल नाक्यावर टोल माफी असूनही नागरिकांची अडवणूक, निलेश माझीरेंनी कर्मचाऱ्यांना सुनावलं!

मोबाईलमुळे करण-अर्जुन मध्ये वाद; लहानग्याचा गळा आवळून मोठ्या भावाने केला खून

शंतनू जाधव हा हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग करत होता. इतक्यात या परिसरात असलेल्या स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेत मुलीचा जीव वाचवला. त्यानंतर शंतनूला चोप देत पेरू गेट पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. या हल्ल्याप्रकरणी पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहेत.

दरम्यान, पुण्यात घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा प्रवृत्तीना रोखण्यासाठी गृहविभागाने तात्काळ कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed