• Sat. Sep 21st, 2024
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग…; RTO अधिकारी विठुरायाच्या भक्तीत दंग, अभंग गात घेतला आनंद

सोलापूर:आषाढी वारी सोहळा आता शेवटच्या टप्प्यात पोहचला असून २९ जून रोजी आषाढी एकादशी रोजी पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या संतांच्या पालख्या आणि पांडुरंगाची भेट होईल. याबरोबरच लाखो वारकऱ्यांनाही विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेली आहे. गेल्या १५ दिवसांपासून वारकरी टाळ-मृदूंगाच्या आणि भजन कीर्तनाच्या गायनात रमत पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. संतांच्या ओव्या- भारुडे आणि विठूनामाच्या गजराच्या भक्तीत तल्लीन होत लाखो वारकरी पायी वारीत सहभागी होत असतात.

कधी एकदा विठुरायाला मिठी मारते असं होतं; ८० वर्षांच्या आजीबाईंना माऊलीची ओढ, अखंड ४५ वर्षे होतात वारीत सहभागी

वारीत अबाल वृद्धांपासून ते लहानग्यांपर्यत सर्वच जण वारीत सहभागी होत आपली दुःख विसरून वारीचा आनंद घेत असतात. आषाढी वारी सुरु झाल्यापासून वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी तैनात असलेले पोलीस देखील आपला क्षीण विसरून वारकऱ्यांसोबत विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होत असतात. असंच सोलापूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर यांनी वारीत सहभागी होत अभंग सादर केला. सध्या त्यांनाच व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.

कालपर्यंत काहीच नाही, दुपारी अचानक शेतात महादेवाची पिंड दिसली, पूजा करण्यासाठी भक्तांची गर्दी
तिरणकर यांनी अबीर गुलाल उधळीत रंग, नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग हा संत चोखामेळा यांचा अभंग सादर केला. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांनी टाळ मृदंगाची साथ देत परिवहन अधिकारी विजय तिरणकर यांना साथ दिल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed