• Thu. Nov 28th, 2024
    मला जगायचं नाही म्हणणारा पालटकर पलटला, पवनकर कुटुंबाच्या हत्या प्रकरणात ट्विस्ट

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: दिघोरी परिसरातील बहुचर्चित पवनकर हत्याकांडातील आरोपी विवेक गुलाबराव पालटकर (वय ४०) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवा, अशी मागणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर केली आहे. तसेच ही फाशी रद्द करा, असे म्हणत आरोपी विवेक पालटकर यानेही फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. ‘मला त्वरित संपवा, मला फाशी द्या, मला आता जगण्याची इच्छा नाही’ असे मत पालटकरने एप्रिल महिन्यात न्यायालयासमोर मांडले होते.
    दोन दिवसांपूर्वी लग्न, माहेरी येऊन नवविवाहितेची प्रियकरासह आत्महत्या, मेहंदीच्या हातांनी आयुष्य संपवलं
    मृत कमलाकर पवनकर हा आरोपी विवेक पालटकरचा मेहुणा होता. पालटकरची त्याच्या पत्नीच्या हत्येतील प्रकरणातून उच्च न्यायालयाने सुटका केली होती. पुढे कमलाकर आणि विवेक यांच्यात संपतीच्या हिस्स्या-वाट्यावरून वाद झाले. १० जून २०१८ रोजी रात्री ९.३० ते १० वाजतादरम्यान विवेक हा कमलाकर यांच्या घरी रात्रीच्या मुक्कामाने आला. सर्वजण झोपलेले असताना विवेकने रात्री तीन वाजताच्या सुमारास लोखंडी सब्बलने एकापाठोपाठ एक घरातील पाच सदस्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांची हत्या केली. मृतांमध्ये कमलाकर पवनकर, त्यांच्या पत्नी अर्चना, आई मीराबाई, मुलगी वेदांती (वय १२) व विवेक याचा मुलगा कृष्णा ऊर्फ गणेश पालटकर याचाही समावेश होता. पोलिसांनी विवेकला अटक केली.

    प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

    याप्रकरणी पोलिस निरीक्षक मुकंद एम. साळुंके यांनी तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. विवेकविरुद्ध यापूर्वीच दोषारोप सिद्ध झाले होते. दोन्ही पक्षांचा फाशीवरील युक्तिवादही पूर्ण झाला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयाने १५ एप्रिल रोजी न्यायालयाने विवेकला फाशीची शिक्षा सुनावली होती. ही फाशी कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात राज्य सरकारने केली आहे. तसेच विवेकने शिक्षेला आव्हान दिले आहे.

    दाम्पत्याच्या वादात मध्यस्थी भोवली, वर्ध्यात वृद्धाला बसमधून खाली उतरवलं, आठ-दहा जणांची मारहाण

    याप्रकरणी सोमवारी न्या. विनय जोशी व न्या. वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने अपील प्रकरण अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतले. तसेच आरोपी विवेकच्यावतीने बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने अ‍ॅड. डी. व्ही. चव्हाण यांची नियुक्ती केली. शिवाय अपील आणि शिक्षा कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर संयुक्त सुनावणी होईल, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed