मडगाव-मुंबई वंदे भारत गोवा (मडगाव) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही गोव्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे. गोवा- मुंबईदरम्यानच्या प्रवासात 1 तासाची बचत या एक्स्प्रेसमुळं होईल. यामुळं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयटनाला चालना मिळणार असून पर्यटक पश्चिम घाटातील प्रेक्षणीय दृष्यांचा आनंद घेऊ शकतात. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकणवली, थिविम या स्थानकांवर ही एक्स्प्रेस थांबेल.
भोपाळ (राणी कमलापती) – इंदोर वंदे भारत एक्सप्रेस मुळं भोपाळ आणि महाकाल नगरी उज्जैनसह इंदोरदरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत १ तासाची बचत होणार आहे. तर, भोपळ जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेसमुळं दरम्यान प्रवासातील वेळेत १ तासाची बचत होईल. या दोन्ही एक्स्प्रेमुळं मध्यप्रदेशच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.
रांची – पटना वंदे भारत एक्सप्रेस ही बिहार आणि झारखंड राज्यातील पहिली वंदे भारत ट्रेन आहे. दोन्ही राज्यांच्या राजधान्यांमधील ट्रेन प्रवास १ तास ४५ मिनिटांनी कमी होणार आहे. दुर्गम टेकड्या कापून तयार केलेल्या बरकाकाना ते रांची (व्हाया सिधवार व शॉकी) या नवीन मार्गावर धावणारी पहिली ट्रेन असेल.याचा बिहार आणि झारखंडच्या पर्यटनाला देखील फादा होणार आहे.
धारवाड केएसआर बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस मुळं धारवाड ते केएसआर बंगळुरूदरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत 1 तासाची बचत होणार आहे. उत्तर कर्नाटकाचे प्रवेशद्वार हुबळी-धारवाडची देशातील सिलिकॉन व्हॅली आणि स्टार्टअप राजधानी बंगळुरूशी वेगवान कनेक्टिव्हिटी निर्माण होईल.
दरम्यान, ओडिशातील रेल्वे अपघातामुळं मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आलं होतं. ते आज पार पडणार आहे.