• Sat. Sep 21st, 2024
धो-धो! मुंबई-पुणे, ठाण्यासह ‘या’ भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, ८ विभागांना ऑरेंज अलर्ट

मुंबई: मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. मान्सूनने एन्ट्री करताच राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार तर कुठे तुरळक पावासाच्या सरी बरसल्या. मुंबईत मान्सूनने जोरदार हजेरी लावली. गेल्या २४ तासात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस बरसला. तर, आज मंगळवारीही मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईसह, पुणे, संपूर्ण कोकण, ठाणे, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि साताऱ्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भाच्या काही भागांतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मंगळवारी विदर्भातील अमरावती, नागपूर परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर भंडारा आणि गोंदिया भागात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात विदर्भात मेघगर्जनेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसात किती पाऊस पडला?

मुंबईत रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या कालावधीत कुलाबा येथे ६३.६ मिमी, तर सांताक्रूझ येथे २४.६ मिमी पाऊस पडला. सांताक्रूझ येथे सायं. ५.३० पर्यंत २७ मिमी पाऊस पडला, तर कुलाबा येथे शून्य मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी दिवसभरात प्रामुख्याने कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई या पट्ट्यामध्ये दिवसभर पाऊस होता. गोरेगाव, अंधेरी या भागांमध्येही पाऊस पडला. सकाळी ७ पासून सायंकाळी ७ पर्यंतच्या १२ तासांमध्ये या भागांमध्ये २० ते ४० मिमीदरम्यान पाऊस नोंदला गेला.

Weather Forecast: राज्यासह देशात मान्सूनची जोरदार एन्ट्री, मुंबई-दिल्लीत ६२ वर्षात जे झालं नाही ते घडलं
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारी कोकण पट्ट्यामध्ये रत्नागिरी, रायगड ते पालघरपर्यंत पावसाचा जोर वाढून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्टचा इशारा कायम आहे. तर उर्वरित कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. सिंधुदुर्गात हा जोर केवळ मध्यम सरींपुरताच मर्यादित राहील अशीही शक्यता आहे.

पहिल्या पावसात कल्याण डोंबिवली महापालिकेची पोलखोल; गटारातील पाणी नागरिकांच्या घरात, कुटुंबाची रात्रभर धडपड

पुढील पाच दिवसांमध्ये उत्तर आणि दक्षिण कोकणामध्ये सर्वदूर पावसाचा अंदाजही आहे. या काळात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर मध्य महाराष्ट्रातही पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी तर त्यानंतर दोन दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस अनेक ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पुढच्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता आहे. मराठवाड्यातही मंगळवारी बहुतांश ठिकाणी पाऊस पडून नंतर जोर कमी होईल. पूर्व आणि पश्चिम विदर्भात मंगळवारी आणि बुधवारी बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

Pune Murder: दर्शनाची हत्या केल्यानंतर लपण्यासाठी काय-काय केलं, राहुलचा प्लान ऐकून पोलिसही चक्रावले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed