• Sun. Sep 22nd, 2024

कागपत्रं अन् रेशनकार्ड नाही? चिंता सोडा! घर मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंना लुटले

कागपत्रं अन् रेशनकार्ड नाही? चिंता सोडा! घर मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंना लुटले

Mira-Bhyander Fraud News : बीएसयूपी सदनिकांच्या बहाण्याने लाखोंचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात काशिमिरा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

fraud (1)
बीएसयूपी सदनिकांच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक
म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमधील बीएसयूपी योजनेत सदनिका देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योजनेची कागदपत्रे व शिधापत्रक बनावट तयार करून त्याआधारे सदनिका देण्याचा दावा केला जात होता.काय आहे प्रकरण?

काशिमिराच्या जनता नगर येथील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी बीएसयूपी योजना राबवली जात आहे. मधल्या काळात केंद्र सरकारकडून ही योजना बंद करण्यात आल्याने, योजनेचे रखडलेले काम पालिका प्रशासनाकडून केले जात आहे. या इमारतीत एक सदनिका मिळवून देण्यासाठी दहिसरमध्ये राहणाऱ्या दयाराम भारती यांच्याकडून आशीष चौहान याने हरीश चौहान याच्यामार्फत २०१५ साली टप्प्याटप्प्यात सात लाख रुपये घेतले होते. दयाराम यांना त्यांच्या पत्नीच्या नावे एक खरेदीखत तयार करून देण्यात आले. यात हा व्यवहार १९९९ साली झाल्याचे दाखवण्यात आले होते. यासह मिरा-भाईंदर महापालिकेने योजनेसाठी २००९ साली केलेल्या सर्वेक्षणाची कागदपत्रे व एक शिधापत्रकही देण्यात आले होते. ही कागदपत्रे दिल्यानंतर प्रत्यक्षात सदनिका देण्यास मात्र मागील काही वर्षांपासून विलंब केला जात होता. त्यामुळे भारती यांनी स्वतः पालिका कार्यालयात जाऊन माहिती घेतली. यावेळी पालिकेच्या नावे त्यांना दिलेली कागदपत्रे व शिधापत्रक बनावट असल्याचे निदर्शनास आले.
अधिकची रोकड घेऊन घराबाहरे पडताय? सावधान! पनवेलमधील या चोराचा कारनामा वाचून धक्का बसेल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, भारती यांनी काशिमिरा पोलिस ठाण्यात सदनिकेच्या व्यवहारात सहभागी असलेल्यांविरोधात तक्रार केली होती. त्यावरून आशीष चौहान, हरीश चौहान, अमरलाला पाल, मंगल गांधी व दयाशंकर यादव अशा पाच जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed