• Mon. Nov 25th, 2024
    ती मुलगी मला ब्लॅकमेल करत होती; रिक्षाचालकाने मृत्यूला कवटाळलं, शेवटच्या क्षणाचा Video

    रत्नागिरी : रत्नागिरी येथील मयत रिक्षा चालक अविनाश म्हात्रे याच्या आत्महत्यापूर्वीचा व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिसांपुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच मयत रिक्षा चालक अविनाश हा जेलमधून जामिनावर सुटला होता.

    अविनाश प्रचंड मानसिक तणावात होता. त्याने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार केल्याचं दिसतंय. त्या व्हिडिओवर तो बोलताना त्याने घरात बसून हा व्हिडिओ बनवल्याचं दिसत आहे. त्यामुळे शनिवारी रत्नागिरीत प्रचंड पाऊस असल्यामुळे शनिवारी सकाळीच त्याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
    सोलापूरच्या राजकारणात भूकंप: केसीआर यांचा पवारांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का, बडा मासा गळाला
    या व्हिडिओमध्ये अविनाशने एका मुलीला दोषी ठरवले असून ती मुलगी आपल्याकडे ब्लॅकमेलिंग करून पैसे मागायची. पैसे दिले नाही म्हणून मला मानसिक त्रास होईल या भावनेतूनच जाणीवपूर्वक आपल्याला या गोत्यात अडकवल्याचे त्याचे म्हणणे आहे. आता ती मुलगी कोण आहे? याता शोध घेणं देखील पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

    दरम्यान, आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. यात पोलीस नेमका काय तपास करतात हेही पाहावं लागणार आहे. या व्हिडिओत अविनाश म्हात्रे स्पष्ट म्हटला आहे की, “ती मुलगी चांगली नाही. ती मला ब्लॅकमेल करत होती. मी जास्त भाव दिला नाही म्हणून तिने माझ्यावर असे घाणेरडे आरोप केले आहेत,” असं अविनाश या व्हिडिओमधून सांगताना दिसत आहे. मात्र, रिक्षाचालकाने पोलिसांच्या ताब्यात असताना ही माहिती पोलिसांना का दिली नाही? असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

    TCS Job Scam: टाटांच्या टीसीएसमध्ये घोटाळा? कंपनीने उचलली मोठी पावले, अहवालांवर उघडपणे केले भाष्य

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed