• Sat. Sep 21st, 2024

चंद्रपुरातील बांधकाम विभाग अभियंत्याचे दिल्ली ड्रग्ज कनेक्शन; NCBची धाड अन् पितळं उघडं

चंद्रपुरातील बांधकाम विभाग अभियंत्याचे दिल्ली ड्रग्ज कनेक्शन; NCBची धाड अन् पितळं उघडं

म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर : पोस्टाच्या माध्यमातून एलएसडी ड्रग्स बोलावणाऱ्या व सेवन करणाऱ्या एका बांधकाम अभियंत्याला दिल्ली येथील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) चमूने पोंभूर्ण्यातून अटक केली आहे. सदर कारवाई गुरुवारी करण्यात आली असून पुढील तपासासाठी अभियंत्याला दिल्ली येथे नेण्यात आले आहे.काय आहे प्रकरण?

दिल्ली येथे अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली एनसीबीने कार्यवाही करून आरोपींना अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू होता. या प्रकरणातील काहींना वेगवेगळ्या भागांतून अटक करण्यात आली होती. पोंभूर्णा येथे एलएसडी २४ व एमडी ३.१८ हे ड्रग्स पोस्टाने पार्सलद्वारे बोलवल्याची माहिती एनसीबीला प्राप्त होताच पोंभूर्णा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सहाय्यक अभियंता असलेले हेमंत बिचवे यांना पोंभूर्णा पोलिसांच्या मदतीने एनसीबीच्या चमूने पार्सल स्वीकारताना ताब्यात घेतले. सदर पार्सलमध्ये सुमारे ७५ हजार रुपये किंमतीचे हे दोन्ही ड्रग्स होते. बिचवे यांच्या रुमवरून काही साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. चौकशी करून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्रामीण पोलिसांच्या वायरलेस विभागात अधिकारी दारू पिऊन ड्युटीवर; पोलीस कर्मचाऱ्यासोबत अरेरावी

पोंभूर्णा न्यायालयात हजर करून पुढील तपास व कार्यवाहीसाठी शुक्रवारी हेमंत बिचवे यांना दिल्लीला नेण्यात आले. दरम्यान या ड्रग्ज प्रकरणाची सर्व सूत्रे दिल्ली येथे जुळलेली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. अभियंता बिचवे हे नागपुरातील रहिवासी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed