सोलापूर: भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतःच्या मतदार संघात लोकसंवादचा सपाटा सुरू केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात अवैध धंद्यानी जोर धरला आहे. यापूर्वी देखील भाजप आमदार सुभाष देशमुख यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठे गावात अवैध हातभट्टी दारू बंद करा अशी मागणी केली होती. भर सभेत आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रुप पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना कॉल केला होता.
अवैध हातभट्टी दारू धंद्यामुळे वैतागलेल्या महिलांनी भाजप आमदार सुभाष देशमुखांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावात अडवून दारू बंदीची मागणी केली. आमदार सुभाष देशमुखांनी महिलां कैफियत ऐकून ताबडतोब पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांना कॉल केला. लवकरात लवकर मतदार संघातील हातभट्टी दारू बंद करण्याच्या सूचना दिल्या.

सुभाष देशमुखांचा ताफा अडवून महिलांचा तीव्र संताप
सुभाष देशमुख २२ जून रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर , विंचुर या दोन गावांची भेट घेत परत जात होते. विंचूर गावातील महिलांनी सुभाष देशमुखांचे वाहन अडवून दारू बंदीची मागणी केली. या गावात हातभट्टी दारूची खुलेआम विक्री होत असून येथील पुरुष आणि तरुण मुले हे व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे येथील दारु विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी संताप व्यक्त केला. भाजप आमदार सुभाष देशमुखांना घेरावा घातला. आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना फोन लावून यासंदर्भात कल्पना दिली. लवकरच येथील सर्व अवैध धंदे बंद करा, अशा सूचना दिल्या.