• Sat. Sep 21st, 2024

EDच्या रडारवर असलेल्या हसन मुश्रीफांच्या पोस्टरवर CM शिंदे, फडणवीसांचा फोटो, चर्चांना उधाण

EDच्या रडारवर असलेल्या हसन मुश्रीफांच्या पोस्टरवर CM शिंदे, फडणवीसांचा फोटो, चर्चांना उधाण

कोल्हापूर : जिल्ह्याचे राजकारण हे दिवसेंदिवस बदलत चालले आहे. गेल्या काही महिन्यांपासून माजी कामगार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्या घरावर आणि जिल्हा बँकेवर ईडीने छापेमारी केली होती. कारखान्याच्या कर्ज प्रकरणावरून ते ईडीच्या रडारवर आहेत. तसेच ईडीकडून मुश्रीफांविरोधात ३५ कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. आता हसन मुश्रीफ पुन्हा एकदा चर्चेत आलेत आहेत एका कार्यक्रमाच्या पोस्टरमुळे.

hasan mushrif news

EDच्या रडारवर असलेल्या हसन मुश्रीफांच्या पोस्टरवर CM शिंदे, फडणवीसांचा फोटो, चर्चांना उधाण


राष्ट्रवादीच्या कार्यक्रम पोस्टरवर शिंदे-फडणवीस यांचे फोटो

गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून कोल्हापुरात शासन आपल्या दारी हे कार्यक्रम घेण्यात आले होते. यावेळी भाजप आणि शिंदे गटात एका जाहिरातीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा असाच एक पोस्टर व्हायरल होत असून ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रम पत्रिकेवरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. हसन मुश्रीफ यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींचे फोटो अपेक्षित असताना येथे मात्र वेगळेच फोटो दिसत आहेत. सतेज पाटलांचं ठरलं! कोल्हापूर लोकसभेत कुणाचा कंडका पडणार? मंडलिक की महाडिक?
गडहिंग्लजमध्ये येत्या २८ जूनला राज्य सरकार आणि हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीनं ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होत आहे. यासाठी कार्यक्रम पत्रिकाही छापण्यात आल्या आहेत आणि यातीलच एक कार्यक्रम पत्रिका आता चांगलीच व्हायरल होत आहे. ही कार्यक्रम पत्रिका पाहून अनेक जणांच्या भुवाया उंचावल्या आहेत. कारण या कार्यक्रम पत्रिकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सोबत महाविकास आघाडीमधील नेत्यांऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दिसत आहेत. यांच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांचा एकही फोटो यामध्ये लावण्यात आलेला नाही. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडवा, आमदार हसन मुश्रीफांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर
‘ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नाही’

दरम्यान, या सर्वांवर आता हसन मुश्रीफ स्पष्टीकरण दिलं आहे. ‘शासन आपल्या दारी’ मधील बहुतांशी योजनांचा जन्म मी मंत्री असताना झाला आहे. आताचं सरकार केवळ या योजना जनतेपर्यंत पोहोचवत आहे. ही योजना कशी राबवली जाते हे राज्याला दाखवून देण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे. पण शासकीय योजना यशस्वी करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे, हे मी आधीपासून सांगत आलो आहे. राष्ट्रवादी पक्षामार्फत आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे. यामध्ये महाविकास आघाडीचा काही संबंध येत नाही. शासन आपल्या दारी कार्यक्रमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. म्हणून त्यांचे फोटो आहेत. आणि राष्ट्रवादी म्हणून शरद पवार आणि अजितपवारांचे फोटो आहेत. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

आमच्यासाठी हा दिवाळी-ईदसारखा आनंदाचा सण; ३२ वर्षांपासून मुस्लीम कुटुंब करतं वारकऱ्यांची सेवा

ईडीच्या कारवाईने मुश्रीफ अस्वस्थ

आमदार हसन मुश्रीफ यांचा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, जिल्हा बँक बँकेवर ईडीने धाडी टाकल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मुश्रीफ अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपने टीका केल्यानंतर तात्काळ प्रतिउत्तर देणारे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर ते काहीसे नरमल्याचे दिसत आहेत. भाजपशी जवळीक साधून राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच ईडी कारवाईपासून सुरक्षित राहण्याचा मुश्रीफ यांचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed