• Sat. Sep 21st, 2024

२५ वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे सरपंचपद, ४ जण झाले सरपंच, कुटुंबाची परिस्थिती वाचून अवाक व्हाल

२५ वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे सरपंचपद, ४ जण झाले सरपंच, कुटुंबाची परिस्थिती वाचून अवाक व्हाल

नांदेड : मागील २५ वर्षांपासून एकाच घरात सरपंचपद असूनही हलाकीची परिस्थिती आहे. सरपंचपद अूनही कुटुंबातील सदस्य आजही सालगडी आणि मोलमजुरीचं काम करत आहेत. आयुष्यात त्यांनी कवडीची कमाई केली नाही आणि त्यांना सरपंच पदाचा गर्वही नाही. मिळेल ते काम करुन कुटुंबीय उदरनिर्वाह करत जनतेची सेवा करत आहे. एका सरपंच कुटुंबाची ही समाजाला विचार करायला लावणारी कहाणी आहे.किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील कुटुंबातील सूनबाई ह्या सद्या दहेली तांडाच्या सरपंच आहेत. कुटुंबात रामदास तोडसाम आणि पार्वतीबाई तोडसाम यांची दोन मुलं आणि सुना नातवंड आहेत. २५ वर्षांपूर्वी रामदास तोडसाम आणि त्यांचे कुटुंबीय रोजगाराच्या शोधात दहेली तांडा येथे आले होते. तोडसाम कुटुंबीय आदिवासी परधान जातीत मोडतात. गावातील मोहन जाधव यांच्याकडे सालगडी म्हणून कामाला आहेत. आजही संपूर्ण कुटुंब सालगडी म्हणून काम करत आहे. जनावरांना पाणी पाजवणे, चारा घालणे यासह शेतातील कामं कुटुंबीय एकत्र करतात. त्या मोबदल्यात कुटुंबीयांना वर्षात जवळपास एक लाख रुपये मिळतात.

इंदुरीकर महाराजांनी घेतली धास्ती, कार्यक्रमात माध्यमांचे कॅमेरे आणि मोबाइल कॅमेऱ्यांवर बंदी
सरपंचपद आदिवासी जातीसाठी आरक्षित झालं अन् लागली लॉटरी

दहेली तांडा हे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं गाव आहे. या गावात जवळपास दोन हजार लोकवस्ती आहे. बंजारा समुदाय येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. मुस्लिम कुटुंबही आहेत. दहेली तांडा २५ वर्षांपूर्वी दहेली गाव आणि दहेली तांडा ग्राम पंचायत वेगळं झाल्यानंतर दहेली ग्राम पंचायतीच सरपंचपद हे आदिवासी समाजासाठी आरक्षित झालं. त्यामुळे आदिवासी समाजातील एकमेव कुटुंब असल्याने रामदास तोडसाम यांना सरपंचपदाची संधी मिळाली. त्यानंतर सलग चार वेळा सरपंचपद हे आदिवासी समाजासाठी कायम राहिलं. रामदास तोडसाम यांनी दहा वर्षे सरपंच तर त्यांची पत्नी पार्वतीबाई तोडसाम ह्या पाच वर्ष, मुलगा राजेंद्र तोडसाम हे पाच वर्ष आणि आता त्यांची सुनबाई मनीषा जयवंत तोडसाम सरपंच म्हणून काम पाहत आहेत. या ग्राम पंचायतीत ९ सदस्य आहेत.

आई वडिलांच छत्र हरवलं, भाऊही दगावला; पण न डगमगता प्रतिभानं अभ्यास केला अन् पहिल्याच प्रयत्नात NEET उत्तीर्ण

पत्र्याच्या घरात सरपंचाचं कुटुंब

एखाद्याला सरपंचपद मिळाल्यानंतर त्याच्या राहणीमानात बदल होत असतो. गाडी घोडी सोबतच आलिशान घरही बांधत असतो. तोडसाम कुटुंब २५ वर्षांपासून सरपंचपदावर आहे. मात्र आजूनही मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करत आहे. एवढचं नाही तर दोन विटाच्या खोल्या आणि वरून पत्रा आहे. घरात सरपंचपद असून यांना घरकुलचा लाभ मिळालेला नाही. शासनाने घरकुलचा लाभ द्यावा, अशी विनंती तोडसाम कुटुंब करत आहे. गावाचा विकास झाला आहे. पण सरपंच असूनही कुठल्याच योजनेचा स्वत:साठी लाभ घेतला नाही, हे विशेष. शासनाने अशा कुटुंबाची दखल घेतली पाहिजे, असा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed