म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक महिला व पुरुष, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध विभागांत ९५६ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु, शासन स्तरावरून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची भरती होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार आल्यामुळे प्रशासनावर ताण येत आहे.राज्याच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के पदे भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत गट ‘क’ संवर्गातील २,५३८ जागा रिक्त आहेत. या जागांच्या ८० टक्के म्हणजे २ हजार ३० जागा भरल्या जाणार आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून या जाहिरातीचा मसुदा तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पण भरती केव्हा होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तर सरळसेवेची ८०० व पदोन्नतीची १५६ अशी ९५६ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक ६०९ पदे आरोग्य सेविकेची आहेत.
पंढरीच्या वारीत दुडूदुडू धावली इवशीली पावले, बाबागाडीत बसून ११ महिन्यांची चिमुकली राधा विठुरायाच्या भेटीलानाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सरळसेवेची १७७९ पदे मंजूर आहेत. त्यात ९७९ पदे भरलेली असून, ८०० भरणे बाकी आहे. पदोन्नतीची ३४३
पदे मंजूर असून, त्यात १८७ पदे भरली आहेत. अद्याप १५६ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात २,१२२ पदे रिक्त असून १,१७१ पदे भरलेली आहेत, तर ९५१ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग वगळता अन्य तालुक्यांमध्ये रिक्त पदांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आरोग्य सेविकांना एकाच वेळी दोन ते तीन आरोग्य केंद्रांशी समन्वय राखावा लागत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे टांगली जात आहेत.
आरोग्य विभागातील रिक्त पदांचा तपशील :
संवर्गाचे नाव- सरळसेवा-पदोन्नती-एकूण
औषध निर्माण अधिकारी — १९ — ० — १९
प्रयोगशाळा तंत्रज्ञ — १२ — ० — १२
आरोग्य पर्यवेक्षक — ३ — ३ — ६
आरोग्य सेवक (पुरुष) — १५७ — ५७ — २१४
आरोग्य सेविका (महिला) — ६०९ — ०० — ६०९
आरोग्य सहाय्यक (पुरूष) — ०० — ६ — ०६
आरोग्य सहाय्यिका (महिला) — ० — ९० — — ९०
एकूण — ८०० ————— १५६ ————— ९५६