• Sun. Feb 16th, 2025
    मान्सूनला उशीर झाल्याने फटका, राज्यातील ‘या’ शहरात फक्त तीन दिवसांचा पाणीसाठा, त्यानंतर…

    पनवेल: पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणातून सध्या दिवसाला चार एमएलडी पाणी उचलले जाते. पुढील तीन दिवसांत धराणातील पाणी पूर्ण संपणार असल्यामुळे महापालिकेला आता पूर्णपणे एमजेपीच्या पाण्यावर विसंबून रहावे लागणार आहे. पूर्वीच्या पनवेल नगरपरिषद क्षेत्रात म्हणजेत पनवेल शहरात बुधवारपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र जल प्राधिकरणाकडून (एमजेपी) विकत घेऊन हा पाणीपुरवठा केला जात होता. एमजेपीने पाणीकपात करताच पनवेल महापालिकेला हा निर्णय घ्यावा लागला आहे. पाऊस लांबल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असून पाऊस पडेपर्यंत पनवेल शहरातील नागरिकांना तुटवडा सहन करावा लागणार आहे.महापालिका क्षेत्रातील पनवेल शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महापालिका एमजेपीवर अवलंबून आहे. महापालिकेच्या मालकीचे देहरंग धरण असले तरी अवघी तीन एमएमक्यूब पाणी साठवणूक क्षमता आहे. त्यामुळे पावसाला सुरुवात होताच धरणातील पाणीउपसा वाढवून पूर्ण क्षमतेने म्हणजेच १६ एमएलडी पाणी सोडले जाते. उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करण्यासाठी डिसेंबर महिन्यात आठवड्यातून पाणीकपातीला सुरुवात केली जाते. सध्या पनवेल शहरात आठवड्यातून एकदा पाणीकपात केले जाते. परंतु, देहरंग धरणातील पाण्याने तळ गाठल्यामुळे उपसा बंद करण्यात आला.

    कालपर्यंत काहीच नव्हतं, आज अचानक १६ व्या शतकातील खजिना पाण्याबाहेर, पाहण्यासाठी गर्दी
    आता एमजेपीकडून मिळणाऱ्या १० ते १२ एमएलडी पाण्यात पनवेलकरांची तहान भागविण्याची कसरत महापालिकेला करावी लागणार आहे. शहराची गरज सुमारे २८ ते ३० एमएलडी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कपात केल्यामुळे नागरिकांना अवघे १५ मिनिटे नळाला पाणी मिळते. बुधवारपासून महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वीच पनवेलमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. महापालिकेने काही दिवसांपूर्वीच पाणीकपात सुरू केली होती. परंतु, अधिकृतपणे बुधवारपासून एकदिवसाआड पाणीकपात सुरू केल्याची घोषणा करण्यात आली.

    Mumbai Weather Forecast: पुढचा आठवडा अत्यंत महत्त्वाचा, धो-धो बरसणार, मान्सूनबाबत मोठी अपडेट
    देहरंग धरणातून सध्या दिवसाला चार एमएलडी पाणी उचलले जाते. पुढील तीन दिवसांत पाणी पूर्ण संपणार असल्यामुळे महापालिकेला आता पूर्णपणे एमजेपीच्या पाण्यावर विसंबून रहावे लागणार आहे. शेजारील नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या १६७ एमएमक्युब क्षमता असलेल्या मोरबे धरणातदेखील पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे पनवेलकरांना आता पावसाची प्रतीक्षा आहे.

    पाणीदार कोल्हापुरात भीषण पाणी टंचाई; लहान लेकरांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांची वणवण, टँकरसाठी रांगा

    पाऊस लांबल्यामुळे देहरंग धरणात पाण्याने तळ गाठला आहे. तीन दिवसांत पाणीउपसा बंद होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेला सहकार्य करावे ही विनंती, जलअभियंता विलास चव्हाण यांचे आवाहन.

    हंडाभर पाण्यासाठी हातपंपावरच उघड्यावर झोपावं लागतं, ‘मटा’च्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed