• Sat. Sep 21st, 2024
मुंबईच्या दवाखान्यात पालिकेचं स्टींग ऑपरेशन, डमी पेशंट पाठवला; सत्य पाहून अधिकारी हादरले…

वसई : नालासोपाऱ्यामध्ये महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात धक्कादायक प्रकार सुरू असल्याची घटना समोर आली आहे. इथे नालासोपारा परिसरात महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करून दवाखान्यात सुरू असलेल्या प्रकाराचा पर्दाफाश केला. यामध्ये जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर चालवत असलेल्या दवाखान्यामध्ये बेकायदेशीर गर्भपात केंद्र सुरू असल्याचं उघकीस आलं आहे. या बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणी डॉ. शशिबाला शुक्ला यांच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Forecast: राज्यात ‘या’ तारखेपासून धो-धो बरसणार पाऊस, कोकणासह ३ भागांना अलर्ट जारी
डॉ. शशिबाला शुक्ला डीएचएमस असून आशिर्वाद क्लिनिक नावाचा नालासोपारा पूर्व विजयनगर इथे गेली ३५ वर्षांहून अधिक काळापासून त्या दवाखाना चालवत आहेत. या दवाखान्यात बेकायेदशीर गर्भपात केंद्र चालवले जात असल्याची माहिती वसई- विरार महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डॉ. शुक्ला यांच्याकडे डमी रूग्ण पाठवून पालिकेच्या आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन केले.

डॉ. शुक्ला यांनी या डमी रुग्णाची कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी न करता त्यांना गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. हा सर्व प्रकार होत असताना आरोग्य विभागाच्या पथकाने डॉ. शुक्ला यांना रंगेहात पकडले. त्यांनतर डॉ. शुक्ला यांच्या विरोधात बेकायदेशीररित्या गर्भपात केंद्र चालवल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. वैद्यकीय विभागाचे डॉ. पंडीतराव राठोड, डॉ.अनाया देव, डॉ. कृपाली फर्डे, मनोज यादव यांच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन करून हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.

Pune Crime: MPSC टॉपर हत्या प्रकरणात राजगडावर सापडला मोठा पुरावा, आता पोलिसांना हवाय फक्त राहुल हांडोरे
डॉ. शुक्ला यांच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात कलम ४२०, बेकायदेशीर गर्भपात अधिनियम, औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसादन तसेच वैद्यकीय गर्भ समाप्ती अधिनियम २००३ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्भपाताच्या गोळ्या एमबीबीएस स्त्रीरोगतज्ञ असलेले डॉक्टर कायदेशीररित्या देऊ शकतात. मात्र डॉ. शुक्ला यांच्याकडे त्या प्रकारची शैक्षणिक पात्रता नसताना देखील बेकायदेशीर रित्या त्या रुग्णांना गर्भपाताच्या गोळ्या देत होत्या. याचप्रमाणे अॅलोपॅथीच्या प्रॅक्टीसही करत होत्या.

रुग्णांवर बेकायदेशीर रित्या उपचार करणे, गर्भपात केंद्र चालवणे व गोळ्या देणे यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. गेली ३५ वर्ष डॉ. शुक्ला या क्लिनिक चालवत असून त्यामुळे हा प्रकार गेली अनेक वर्ष सुरू असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर यानंतर नागरिकांनी केवळ अधिकृत स्त्रीरोगतज्ञांकडूनच गर्भपातासंदर्भात उपचार घ्यावेत असे आवाहन पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली आहे.

Mumbai Murder Case : सरस्वतीचा DNA, मनोजचा ‘तो’ मेसेज अन् सेक्स अ‍ॅडिक्ट; मिरारोड मर्डर केस पोलिसांनी सोडवली?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed