• Mon. Nov 25th, 2024

    काँग्रेस प्रदेश सचिवांनी भर सभेत केली मोठी चूक, राजीव गांधींच्या स्मृती दिनबाबत बोलले…

    काँग्रेस प्रदेश सचिवांनी भर सभेत केली मोठी चूक, राजीव गांधींच्या स्मृती दिनबाबत बोलले…

    Congress Secretary Rajan Bhosale Statement On Rajiv Gandhi Death Anniversary : कल्याणमध्ये काँग्रेस कार्यक्रमात प्रदेश सचिवांनी भाषणात एक चूक केली. नंतर त्यांनी चूक सुधारली. पण ही चूक संपूर्ण कार्यक्रमात चर्चेचा विषय बनली. या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते.

     

    काँग्रेस प्रदेश सचिवांनी केली चूक, राजीव गांधीचा स्मृती दिन कोणता हेच त्यांना माहिती नाही
    कल्याण : कल्याणमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा मेळावा पार पडला. मात्र या मेळाव्या दरम्यान काँग्रेसच्या एका नेत्याने अकलेचे तारे तोडले आहे. राजन भोसले हे कल्याण जिल्हा प्रभारी आणि प्रदेश सचिव आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे. आजचा दिवस महान आहे, अशी सुरुवात केली. मात्र महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी त्यांना हटकले. हे ऐकून मंचावर बसलेले नाना पटोले यांच्यासह नेते आणि पदाधिकारी हैराण झाले.कल्याणमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीने अत्रे रंगमंदिरात पक्षाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित होते. या मेळाव्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली हेती. सभागृह खच्चून भरले होते. अनेकांना तर बसायला जागा मिळाली नाही.

    आमदार गीता जैन यांनी अभियंत्याचा शर्ट खेचला, कानशिलातही लगावली; नेमकं काय घडलं?
    कल्याण जिल्हा प्रभारी आणि प्रदेश सचिव राजन भोसले यांनी भाषणाला सुरुवात केली. मित्रांनो आज आपल्याकडे महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी राजीव गांधी यांची हत्या झाली होती. राजीव गांधी याचा आज स्मृती दिवस असल्याने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. अशा दूरदृष्टी नेत्यामुळेच… असे बोलत असताना महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी या त्यांनी त्यांना हटकले. त्यांनी त्यांची चूक निदर्शनास आणून दिली. आज स्मृती दिन नाही. तेव्हा लगेच भोसले यांनी त्यांची चूक सुधारत राजीव गांधी यांचा स्मृती दिन २१ मे रोजी असतो, असे सावरून घेतले.

    मुख्यमंत्री भाषण करतेवेळी व्यापाऱ्यानं थेट समस्या मांडली; शिंदेंनी शांतपणे मार्ग काढला

    काँग्रेसच्या प्रदेश सचिवला राजीव गांधी यांचा स्मृती दिन कोणता हे माहिती नसल्याने मंचावरील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते हैराण झाले. प्रदेश सचिव भोसले यांनी त्यांच्य भाषणात अकलेचे तारे तोडल्याने त्यांचे हे भाषण चर्चेचा विषय झाले आहे.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed