पोलिसांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांसह त्यांचे समर्थक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमिपूजनावरून आमने-सामने आले होते. या प्रकरणी सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी बुधवारी रात्री तक्रार दिली. या प्रकरणी ३५ ओळखीचे आणि १५ अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार देण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले, विनीत पाटील, अजय मोहिते, सनी मुरलीधर भोसले, समीर माने, राहुल गायकवाड, सुभाष मगर, रंजना रावत, किशोर शिंदे, कुणाल चव्हाण, अमोल तांगडे, पंकज चव्हाण, स्वप्नील घुसाळे, नंदकुमार नलवडे, रोहित लाड, युनूस जेंडे, अनिल पिसाळ,काशिनाथ गोरड, संपत महादेव जाधव, शेखर चव्हाण, गितांजली कदम, अश्विनी संतोष गुरव, सौरभ संजीव सुपेकर, प्रवीण धसके, सुनील काटकर, संदेश कुंजीर, सागर गणपत जाधव, गणेश जाधव, पंकज मिसळ, सतीश माने, अर्चना देशमुख, जितेंद्र खानविलकर, सोमनाथ धुमाळ, अभिजित मोहिते यांच्यासह ५० जणांच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमका वाद?
सातारा शहरालगत असलेल्या खिंडवाडी येथील संभाजीनगरमधील जागा आहे. ज्याच्यावरून हा वाद सुरू आहे, ही जागा शासनाने आरक्षित करून सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली आहे. या जागेचे मूळ मालक हे खासदार उदयनराजे आहेत आणि यामध्ये काही कुळे सुद्धा या आहेत. परंतु ही जागा आरक्षित झाल्यामुळे या जागेवरून वाद सुरू झाला.
हा वाद कोर्टात पोहोचला आणि शिवेंद्रराजे यांच्या म्हणण्यानुसार सुप्रीम कोर्टानेही बाजार समितीसाठीच ही जागा आरक्षित ठेवावी, अशा प्रकारचा आदेश दिला आहे. आणि खासदार उदयनराजे यांच्या म्हणण्यानुसार या जागेवर त्यांचा स्वतःचा हक्क आहे आणि माझ्या जागेमध्ये काय करायचे हे मी ठरवणार अशी उदयनराजेंची भूमिका आहे.