• Mon. Nov 25th, 2024

    चिमुरडी खाऊ उचलायला वाकली, लक्ष नसलेल्या काकाने टेम्पो मागे घेतला; चाकाखाली चिरडून अंत

    चिमुरडी खाऊ उचलायला वाकली, लक्ष नसलेल्या काकाने टेम्पो मागे घेतला; चाकाखाली चिरडून अंत

    मुंबई: टेम्पोच्या मागच्या चाकाखाली चिरडून एका ११ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दहिसरमध्ये घडली आहे. दहिसर पूर्वेला असणाऱ्या घरटनपाडा परिसरात रविवारी ही घटना घडली. या दुर्घटनेत आंचल जैस्वाल या अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. आंचल हिचे काका संतोष जयस्वाल हे टेम्पो मागे घेत असताना आंचल गाडीच्या मागच्या चाकाखाली आली. यामध्ये आंचलला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात नेईपर्यंत खूप उशीर झाला आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दहिसर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी संतोष जैस्वाल यांच्यावर निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

    जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला; दिंडीत सेवा करणाऱ्या वारकऱ्याचा मृत्यू, वारीत हळहळ

    आंचल जैस्वाल ही घरटानपाड्यात आपल्या पालकांसह राहत होती. याठिकाणी तिची मोठी बहीण आणि दोन सावत्र भावंडेही असे कुटुंब राहत होते. आंचल जैस्वाल हिचे वडील राजू जैस्वाल मंडपाचा व्यवसाय करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जैस्वाल यांनी त्यांच्या भावाच्या नावावर टेम्पो खरेदी केला होता. हा टेम्पो ते भाड्याने द्यायचे. दिवसभराचे काम संपल्यानंतर संध्याकाळी संतोष किंवा सुशील यापैकी एकजण टेम्पो घरी आणत असे. हे दोघेही घरी परतताना लहान मुलांसाठी खेळणी आणि खाऊ घेऊन यायचे. त्यामुळे घरातील लहान मुलं टेम्पो घरी येण्याची वाट बघत. रविवारीही घरातील लहान मुले जवळच खेळत होती. त्यावेळी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांना टेम्पो येताना दिसला. संतोष जैस्वाल टेम्पो पार्किंगसाठी पाटीलवाडी येथे जाणार होते. मात्र, त्यापूर्वी संतोष लहान मुलांना खाऊ देण्यासाठी घराजवळ थांबले होते. संतोष यांनी इतर मुलांसोबत आंचलच्या हातातही खाऊ ठेवला. मात्र, आंचलच्या हातातील खाऊ खाली पडला. यावेळी आंचल टेम्पोच्या मागच्या चाकाजवळ उभी होती. खाली पडलेला खाऊ उचलण्यासाठी आंचल खाली वाकली, नेमके तेव्हाच संतोष जैस्वाल हे पुढे जाण्यासाठी टेम्पोत पुन्हा बसले आणि त्यांनी गाडी सुरु केली. आंचल गाडीच्या मागच्या चाकापाशी वाकली आहे, हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांनी गाडी मागे घेतली आणि ११ महिन्यांची आंचल टेम्पोच्या चाकाखाली चिरडली गेली, असे राजू यांनी सांगितले.

    धुळीपासून बचावासाठी काळजी घेतली; त्याच स्कार्फने जीव गेला, जिनींग मिल महिला कामगाराचा मृत्यू

    आंचल टेम्पोखाली आल्याचे दिसताच आजुबाजूला असलेल्या लहान मुलांनी आरडाओरडा केला. मुलांचा आवाज ऐकून संतोष जैस्वाल यांनी टेम्पो थांबवला. तेव्हा आंचलचा सावत्र भाऊ घरी धावत गेला आणि त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी आंचलची आई आणि वडील राजू जैस्वाल घरातील रोजची कामं करत होते. टेम्पोच्या मागच्या चाकाखाली आल्यामुळे आंचलला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच राजू जैस्वाल तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी आंचलला उचलून जवळच असलेल्या जय अंबे रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी आंचल हिची दुखापत गंभीर असल्याने तिला कांदिवलीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, त्याठिकाणी नेल्यानंतर डॉक्टरांनी आंचलला मृत घोषित केले. या घटनेमुळे जैस्वाल कुटुंबीय आणि घरटानपाडा परिसरावर शोककळा पसरली आहे.

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी दुर्घटना; ऑईल टँकरला भीषण आग; ३ जणांचा होरपळून मृत्यू

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed