• Sat. Sep 21st, 2024

दर्शना पवारसोबत राजगडावर गेलेला मित्र नेमका कुठे? ATM कार्ड आणि लास्ट कॉल लोकेशन सापडलं

दर्शना पवारसोबत राजगडावर गेलेला मित्र नेमका कुठे? ATM कार्ड आणि लास्ट कॉल लोकेशन सापडलं

पुणे: राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्या अंगावर जखमा आढळल्यानं तिचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासह १२ जून रोजी राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. दोघेही दुचाकीवरुन तिथं दाखल झाले होते. सकाळीच्या १० च्या सुमारास राहुल हांडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याचं एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. तेव्हापासून राहुल हांडोरे गायब आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

राहुल हांडोरे नेमका कुठं आहे?

वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता बागवे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या वृत्तानुसार गायब असलेल्या राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता. पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाले. त्यानंतर कसलिही माहिती न दे त्यानं फोन बंद केला होता. त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं.
Pune Crime: पोरगी MPSC परीक्षेत राज्यात तिसरी, पण मित्रासोबत गेल्यानंतर भयंकर घटना; सत्कारानंतर काय झालं?

पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाट टीम तयार केल्या आहेत. ९ जूनपासून दर्शना पवारच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. वेल्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी याबाबत माहिती दिली. ती १२ जून रोजी राजगड परिसरात कशी पोहोचली याचा शोध घेण्यात येत आहे.
Pune Crime: दर्शनाने MPSC गाजवून सत्कार घेतला, मित्रासोबत रायगडावर गेली अन् पुढे…; टॉपर पोरीसोबत काय झालं?
सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदाशिव पेठेतील क्लासमध्ये सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. तो कार्यक्रम ९ जून रोजी पार पडला होता. त्या कार्यक्रमासाठी ती कोपरगाववरुन पुण्याला दोन दिवस आली होती. पुण्यात दोन दिवस राहिल्यानंतर तिच्या मौत्रिणीकडे कार्यक्रमासाठी नऱ्हे येथे गेली होती. तिथून ती सिंहगडला जाणार म्हणून निघाली होती.
Pune Crime : MPSC उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार प्रकरणाला धक्कादायक वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच पोलीस हैराण…

टोल नाक्यावर टोल माफी असूनही नागरिकांची अडवणूक, निलेश माझीरेंनी कर्मचाऱ्यांना सुनावलं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed