उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, काही काही लोकांनी जाहिरातीची धास्ती घेतली आहे, त्यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आजचं दिल्या आहेत. घटनाबाह्य सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आजच दिल्या आहेत. २० जून जागतिक खोके दिन आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडी सरकारतर्फे सुवर्णकाळ आणायचा प्रयत्न करत होतो. देशातल्या टॉप तीन मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव सलग दोन वर्ष येत होतं, असंही ते म्हणाले.
सरकार पाडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे, असं विचारलं तर उद्धव ठाकरे यांचं नाव सांगितलं जातं. काही लोक दुसऱ्यांचे वडील देखील चोरतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले. जास्तीत जास्त महिला नगरसेवक झाल्या, महापौर देखील शिवसेनेकडून झाल्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही काय केलं हे ज्या प्रमाणं दाखवतो तसं जे सोडून गेले त्यांनी देखील दाखवावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
एका वर्षात गद्दारांनी मुंबईत काय केलं ते सांगावं असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी लंडनमध्ये ५० खोके म्हटल्यावर एका व्यक्तीनं ५० खोके म्हटल्याची आठवण आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. समाज पुढं न्यायचं असलं तर त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं असतं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.