• Fri. Nov 29th, 2024

    कोणी काठीनं मारलं तर कोणी वीट मारली, आईच्या उत्तरकार्यात लेकाला बेदम मारहाण; मुलाचा मृत्यू

    कोणी काठीनं मारलं तर कोणी वीट मारली, आईच्या उत्तरकार्यात लेकाला बेदम मारहाण; मुलाचा मृत्यू

    धुळे : आईच्या उत्तरकार्यासाठी आलेल्या खर्चावरून वाद झाल्याने मुलालाकोणी काठीनं मारलं तर कोणी वीट मारली, माऊलीच्या उत्तरकार्याच्या खर्चावरुन वाद; लेकाचा मृत्यू

    जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमीला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेत ज्ञानेश्वर नामदेव शिंदे (वय ४५, रा. नथ्थूबाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे) यांना जीव गमवावा लागला. या घटनेच्या अनुषंगाने त्यांची पत्नी आशाबाई शिंदे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार धुळे शहर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

    पीडित आशाबाई ज्ञानेश्वर शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ६ जूनला त्यांच्‍या सासू केसरबाई नामदेव शिंदे यांच्या उत्तरकार्यासाठी पती ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांच्यासोबत धुळे शहरातील मोहाडी उपनगरात गेल्या होत्या. या ठिकाणी त्यांचे पुतणे, जेठानी, भाचे, भाची आणि नणंद आदींनी उत्तरकार्याच्या खर्चावरून ज्ञानेश्वर शिंदे यांच्याशी वाद घातला. हा वाद सतत तीन दिवस चालू राहिल्यानंतर काल सायंकाळी भाचा मनोज सोनवणे, सागर सोनवणे, जेठानी रंजना शिंदे, पुतणे चेतन शिंदे, मयूर शिंदे, सचिन शिंदे, नणंद सकुबाई, छोटी, विमल यांनी मारहाण केली. तसेच भाच्या राणी आणि सोनी, पाहुणे जगू सोनवणे, पुतणी कामिनी आदींनी एकत्र येत ज्ञानेश्वर शिंदे आणि आशाबाई शिंदे यांना शिवीगाळ केली. वाद विकोपास गेल्याने पती-पत्नी दोघांनाही मारहाण करण्यात आली.

    नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं, उद्धव ठाकरेंचं चॅलेंज; अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले…
    मनोज सोनवणे याने त्याच्या हातातील काठीने ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पाठीत मारहाण केली. पुतणी कामिनी हिने वीट मारून फेकली. या हाणामारीत ज्ञानेश्वर शिंदे हे जबर जखमी झाले. त्याचवेळी घटनास्थळी मोहाडी पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी ज्ञानेश्वर शिंदे यांना वाहनात बसवून त्यांना नेण्याचा प्रयत्न केला असता शहरातील अग्रसेन पुतळ्याजवळ ज्ञानेश्वर शिंदे यांच्या छातीत अचानक वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना धुळे जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने रुग्णवाहिकेतून त्यांना नवीन जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणीअंती ज्ञानेश्वर शिंदे यांना मृत घोषित केले.

    यानंतर आशाबाई शिंदे यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ज्ञानेश्वर शिंदे यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास करून पोलीस कोणावर काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

    Pune Crime: राजगडच्या पायथ्याशी सडलेल्या अवस्थेत MPSCच्या तरुणीचा मृतदेह; पुणे हादरलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed