• Sat. Sep 21st, 2024
कॉल आला अन् बाईक थांबवली, डोक्यावर रॉडने वार; अकोल्यात मध्यरात्री दिव्यांग प्राध्यापकाची हत्या

अकोला : अकोला जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना दिसून येतं आहे. कारण अकोल्यात गेल्या काही दिवसात अनेक हत्या झाल्या आहेत. सुमारे ५ महिन्यात २३ हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या घटनांमध्ये हत्या झालेले आणि हत्या करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. अकोल्यात खुलेआम टोळीयुद्ध सुरु असल्याचं चित्र आहे. कारण ज्याची हत्या होतंय त्याचे साथीदार मारेकऱ्यांना ठार मारतात.

जे लोक कारागृहात आहेत त्याचे साथीदार कारणीभूत ठरणाऱ्या लोकांना बाहेर खुलेआम टोळीनं मारत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, अकोला पुन्हा हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास एका सेवानिवृत्त प्राध्यापक तथा पत्रकाराची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली. प्रा. रणजित देविदास इंगळे असं मयत सेवानिवृत्त प्राध्यापकचं नाव असून, ते दिव्यांग आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणात सध्या सर्व आरोपी अज्ञात असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं, उद्धव ठाकरेंचं चॅलेंज; अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले…
काय आहेय संपूर्ण घटना?

अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गंगानगर परिसरात राहणारे रणजीत देविदास इंगळे काल शनिवारी रात्रीच्या सुमारास घराकडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर फोन आला. इंगळे यांनी मोटारसायकल उभी केली आणि ते मोबाईलवर बोलू लागले. याच दरम्यान अज्ञात व्यक्तीनं मागून येऊन इंगळे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला. या हल्ल्यात इंगळे हे गंभीर जखमी झाले अन् डोक्यातून रक्तस्राव होऊन इंगळे रस्त्यावर कोसळले. त्यानंतर अज्ञात मारेकरानं जखमी इंगळे यांना ओढून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकच्या बाजूला नेवून टाकले. मग मारेकरी हा घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. त्याशिवाय अकोला पोलिसांचं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक, एसडीपीओ पथकानं देखील पाचारण केलं होतं. अन् पुढील तपास सुरू केला. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता एका कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्याचे दिसून आले. पण त्यात अस्पष्ट दिसून येत आहे. सध्या पोलिसांनी या कॅमेऱ्यातील फुटेज ताब्यात घेतले असून, मारेकरी एकटा असल्याचे दिसून सीसीटीव्ही कॅमेरा दिसून येतोय. इंगळे यांच्या जवळील पैसे आणि वस्तू तशाच असल्यानं लुटण्याच्या उद्देशाने ही घटना घडली नसल्याचे स्पष्ट होतंय. रणजित इंगळे यांच्या हत्येचं नेमकं कारण काय? याचा तपास जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे करत आहेत.

रणजीत इंगळे नेमके कोण?

रणजीत इंगळे हे पेशेनं पत्रकार असून, तसेच सेवनिवृत प्राध्यापक आहे. इंगळे यांनी दिव्यांग बांधवांसाठी सातत्याने अनेक काम केलं आहे. त्यांच्या हत्येमागचं मूळ कारण काय आहे? हे कळू शकले नाही. दरम्यान, इंगळे याशिवाय वधू वर परिचय म्हणजे लग्न जोडून देण्याचं कामकाज करत होते. एका लग्न संदर्भात त्यांची चर्चा सुरू होती, ते लग्न मोडल्या गेल्यानं तरुण त्यांच्यावर नाराज होता, कदाचित त्यातूनचं हे हत्याकांड घडलं असावं, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Monsoon Update : मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी स्थिती नेमकी कशी, हवामान विभागाची नवी अपडेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed