• Mon. Nov 25th, 2024
    Shishir Shinde : ‘शिशिर काका, बस करा हे’ ठाकरेंची साथ सोडताच मनसे नेत्याचं ट्विट

    Shishir Shinde : माजी आमदार शिशिर शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शिंदे यांच्या निर्णयावर मनसे नेत्यानं टीका केली आहे.

     

    हायलाइट्स:

    • शिशिर शिंदे यांचा ठाकरेना जय महाराष्ट्र
    • मनसे नेत्याची शिंदे यांच्यावर टीका
    • अमेय खोपकर यांची टीका
    मुंबई : माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी पक्ष सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला होता. शिशिर शिंदे यांनी त्यांना मिळालेलं पद हे शोभेचं होतं असं देखील म्हटलं होतं. शिशिर शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी ते भविष्यात कुठल्या राजकीय पक्षात जाणार यासंदर्भात माहिती समोर आली नव्हती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर आली आहे. शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी मनसे नेते अमेय खोपकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. खोपकर यांनी शिंदे यांना एक सल्ला देखील दिला आहे.

    अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?

    “शिशिर काका, बस करा हे आता हे धंदे … खरतर निवृत्तीचे वय झालंय. इकडून तिकडे बेडूक उड्या मारणे शेाभत नाही. मागे वळून बघण्याचा विचार सुद्धा करू नका. सतत बाळासाहेब, बाळासाहेब करून ना कधी सहानुभूती मिळाली आणि ना कधी मिळणार. आता घरी बसून आराम करा. फुकटचा पण प्रामाणिक सल्ला आहे, घ्यायचा तर घ्या नाहीतर सोडून द्या” अशा शब्दात अमेय खोपकर यांनी शिशिर शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

    अजित पवारांचा अनोखा अंदाज, संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याच्या रथाचं सारथ्य

    कोण आहेत शिशिर शिंदे?

    शिशिर शिंदे हे मनसेकडून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार झाले होते. त्यापूर्वी ते शिवसेनेत कार्यरत होते. शिवसेना सोडून ते मनसेमध्ये दाखल झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांनी एकदा लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. २०१८ मध्ये ते शिवसेनेत परत दाखल झाले होते. शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना उपनेतेपद देण्यात आलं होतं. उपनेतेपदी वर्णी लागली मात्र जबाबदारी नसल्यानं ते नाराज होते. उद्धव ठाकरे यांची भेट देखील गेल्या सहा महिन्यांपासून झाली नसल्याचं ते म्हणाले होते.
    Manisha Kayande : मनिषा कायंदे यांच्यावर ठाकरे गटाची मोठी कारवाई, शिंदे गटात जाण्यापूर्वीचं उचललं पाऊल
    दरम्यान, मनसेच्या अमेय खोपकर यांनी केलेल्या टीकेला शिशिर शिंदे काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.
    RBI : ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा दावा आरबीआयनं फेटाळला, काय घडलं ते सांगितलं

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *