• Sat. Sep 21st, 2024

मातोश्रीला खरमरीत पत्र धाडत शिशिर शिंदेंचा पक्षाला जय महाराष्ट्र; शिंदे गटाने लावली फिल्डिंग

मातोश्रीला खरमरीत पत्र धाडत शिशिर शिंदेंचा पक्षाला जय महाराष्ट्र; शिंदे गटाने लावली फिल्डिंग

मुंबई: शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पक्षाला पुन्हा खिंडार पडायला सुरुवात झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आज मुंबईत ठाकरे गटाचे शिबीर आयोजित करण्यात आली आहे. नेमक्या याच मुहूर्तावर ठाकरे गटातील काही नेते पक्षाला रामराम ठोकताना दिसत आहेत. आज सकाळपासूनच ठाकरे गटाच्या फायरब्रँड प्रवक्त्या मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत. त्या शिबिराला येणे अपेक्षित होते. परंतु, त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने त्या आता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिशिर शिंदे यांनीही पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. पक्षात बाजूला पडल्यामुळे शिशिर शिंदे नाराज होते. त्यामुळेच आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे शिशिर शिंदे यांनी म्हटले आहे. शिशिर शिंदे हे कोणत्या पक्षात जाणार, याबाबतची माहिती गुलदस्त्यात असली तरी शिंदे गटाने त्यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केल्याचे समजते. त्यामुळे आता ते शिंदे गटाच्या गळाला लागणार का, हे पाहावे लागेल.

शिशिर शिंदे यांनी राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात शिशिर शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना ठाकरे गटात मनासारखे काम मिळत नाही, अशी खंत त्यांनी पत्रात बोलून दाखवली आहे. गेल्या सहा महिन्यांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत घेणेदेखील अशक्य झाले आहे. शिशिर शिंदे यांची १९ जून २०१८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत घरवापसी झाली होती. चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते. चार वर्षात माझे नेतृत्व आणि कौशल्याकडे ठाकरे गटानं दुर्लक्ष केलं. माझी घुसमट मी थांबवतो, असे शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Manisha Kayande: वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला मोठा धक्का, मनिषा कायंदे शिंदे गटात जाणार?

माझ्या आयुष्यातील चार अमूल्य वर्षे फुकट गेली अशी माझी धारणा आहे. ३० जून २०२२ रोजी माझी “शिवसेना उपनेते” म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले, असा टोलाही शिंदे यांनी आपल्या पत्रातून लगावला. शिशिर शिंदे हे २००९ ला भांडुप विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, मातोश्रीवर जात शिशिर शिंदे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केल्याचे सांगितले जात आहे. घरवापसीनंतर तब्बल ४ वर्ष पक्षात राजकीय पुनर्वसनासाठी वाट पाहावी लागली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिशिर शिंदे यांची पक्षाच्या उपनेते पदी वर्णी लागली होती.

अजित पवारांनी हाती धनुष्यबाण घेतला अन् असा निशाणा लावला की उपस्थितांनी जल्लोष केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed