• Sat. Sep 21st, 2024
Monsoon Impact : मान्सूनचा पाऊस लांबला, भाजीपाल्याचे दर भडकले, बाजारात नेमकं काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: जून महिना अर्धा सरला तरी पावसाने ओढ लावल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी दोन महिन्यांपासून स्थिर असलेले भाजीपाल्याचे भाव आता वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ४० ते ६० रु. प्रति किलो हा दर आता घाऊक बाजारातच दिसू लागला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाववाढ जाणवू लागली आहे. नजीकच्या काळात आणखी भाववाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.

गेल्या काही दिवसांत मागणीपेक्षा आवक वाढल्याने भाज्यांचे भाव उतरले होते. त्यामुळे बऱ्याच भाज्या घाऊक बाजारात १० ते १२ रु. किलो दराने मिळत होत्या. एप्रिल, मे महिन्यात तर भाज्यांचे घाऊक दर निम्म्यावर आले होते. नागरिक मोठ्या संख्येने गावी, परगावी गेल्याने मुंबईत भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे भाज्यांचे दर कमी झाले होते. मात्र आता मुंबईकर परतल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. मात्र मागणी वाढलेली असतानाच पाऊस लांबल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. भाव वाढल्याने मागणी असूनही भाजीपाल्याला उठाव मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.

गंभीरने पान मसालावरून गावस्करांना झापलं, फॅनने तो व्हिडिओ व्हायरल करत केली बोलती बंद

किरकोळ बाजारात आत्तापर्यंत २० रु. किलोमध्ये मिळणारा टोमॅटो सध्या ४० रु.वर पोहोचला आहे. घाऊक बाजारात ८ ते १० रु. किलोपर्यंत असलेला टोमॅटो आता २२ ते २५ रु.पर्यंत पोहोचला आहे. तसेच कोथिंबिरीच्या दरातही दुप्पट वाढ झाली आहे. दहा रुपये एक जुडी असा भाव असलेली कोथिंबीर आता ३० रुपयांवर पोहोचली आहे.
मला ५० वर्षच जगायचंय, पण जाताना हळहळ लावेन, स्मशानातली गर्दी माझं प्रेम सांगेल, धानोरकरांचे शब्द खरे ठरले

भाजी सध्याचे दर मागील किरकोळ दर

भेंडी : सध्याचा दर : ६० ते ८० मागील किरकोळ दर : ४० ते ५०

फरसबी: सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ४० ते ६०

गवार: सध्याचा दर : ७० ते ८० मागील किरकोळ दर : ५० ते ६०

घेवडा : सध्याचा दर :६० ते ८० मागील किरकोळ दर :५० ते ६०

कारली : सध्याचा दर : ६० ते ८० मागील किरकोळ दर : ५० ते ५५

ढोबळी मिरची : सध्याचा दर : ७० ते ८० मागील किरकोळ दर : ६० ते ६५

शेवगा शेंग : सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ५० ते ६०

सुरण : सध्याचा दर :८० ते ९० मागील किरकोळ दर : ६० ते ७०

मटार : सध्याचा दर :१०० ते ११० मागील किरकोळ दर : ६० ते ८०

हिरवी मिरची : सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ५० ते ६०

आता घेणार अपमानाचा बदला; भाजपच्या दोन माजी आमदारांनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला, BRS कडून लढवणार निवडणूक

पेशानं डॉक्टर, पण आवड शेतीची, अखेर निर्णय घेतला अन् आज हळदीपासून ते आंब्यापर्यंत लागवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed