• Fri. Nov 29th, 2024

    संजय राऊतांना धमकी देणारा सापडला, पण चौकशीदरम्यान नवा ट्विस्ट, पोलीसही बुचकळ्यात पडले

    संजय राऊतांना धमकी देणारा सापडला, पण चौकशीदरम्यान नवा ट्विस्ट, पोलीसही बुचकळ्यात पडले

    मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देणे किंवा त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोधून काढले आहे. या व्यक्तीचे नाव मयूर शिंदे असे आहे.

    प्राथमिक माहितीनुसार, कांजूरमार्ग पोलिसांनी मयूर शिंदे यांना अटक केली आहे. मयूर शिंदे यांच्यावर मुंबई उपनगरात अनेक गुन्हे दाखल आहेत. मयूर शिंदे यांची पार्श्वभूमी जरी गुन्हेगारी क्षेत्रातील असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवेश केला होता. खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा सोबत त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याची माहिती देखील समोर येत आहे. आमदार सुनील राऊत यांच्या २०१४ च्या निवडणूक प्रचारासाठी मयूर शिंदे यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे आता याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. राऊत कुटुंबीयांच्या इतक्या जवळ असणाऱ्या व्यक्तीनेच संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी का दिली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामागे नेमका काय हेतू असावा, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या ट्विस्टमुळे पोलिसांसमोरी आव्हान वाढले आहे. तसेच मयूर शिंदे यांनी संजय राऊत यांना धमकी का दिली, याबद्दल संभ्रम आणखीनच वाढला आहे.

    भाजप स्वत:च निर्माण केलेल्या जाळ्यात सापडलाय, संजय राऊतांकडून अमित शाहांच्या भाषणाची चिरफाड, म्हणाले…

    संजय राऊत यांना नेमकी काय धमकी मिळाली?

    सरकारविरोधात बोलणं थांबवा अन्यथा गोळ्या घालू, मला वारंवार धमक्या येतायत, अशी तक्रार संजय राऊत यांनी केली होती. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना धमकीचा कॉल आला होता. संजय राऊतांना सकाळचा भोंगा बंद करायला लाव. त्याला कॉल उचलायला सांग. संजय राऊत आणि तुला (सुनील राऊत) गोळ्या घालणार आणि एका महिन्याच्या आत दोघांना स्मशानात पाठवणार”, अशी धमकी कॉलवरून देण्यात आली होती. आरोपीने शिवीगाळही केली होती.

    यानंतर कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ५०६ (२) आणि ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलीस कारवाईवेळी रिझवान झुल्फिकार अन्सारी आणि शाहिद अन्सारी या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता मयूर शिंदे यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती आणखी कोणती माहिती हाती लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

    सर्व्हे सरकारी बंगल्यात केला की गुजरातमध्ये कोट्यावधींच्या जाहिरातींवरून संजय राऊतांचा टोला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed