• Sat. Sep 21st, 2024

लाचखोर सतीश खरेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला; ACB तपासात प्रगती नसल्याने कोर्ट नाराज

लाचखोर सतीश खरेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला; ACB तपासात प्रगती नसल्याने कोर्ट नाराज

Nashik Bribe News : लाचखोर सतीश खरेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. ३० लाखांची लाच घेतल्याचे प्रकरण.

 

acb nashik
लाचखोर सतीश खरेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : तब्बल ३० लाखांची लाच घेताना पकडलेला जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याचा जामीन अर्ज न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला. खरे याच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि. १४) न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी अर्ज फेटाळण्यात आल्याने खरे याचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.खरेला ३० लाखांची लाच घेताना पकडण्यात आले होते. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने, स्थावर मालमत्ता आढळली होती. लाचेची रक्कम मोठी असल्याने त्याचा जामीन अर्ज पहिल्यावेळी न्यायालयाने फेटाळला होता. खरे याला जामीन दिला तर पुराव्यांमध्ये फेरफार होऊ शकते, अशी शक्यताही वर्तविली गेली होती. बुधवारी पुन्हा त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या तपासात फार प्रगती नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
सतीश खरे, सुनीता धनगर यांचा मुक्काम कारागृहातच; जामीन अर्जावर उद्या सुनावणीची शक्यता
सहकार व शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असून, अशा आरोपींना जामिनावर सोडल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असा युक्तिवाद अॅड. झुंजार आव्हाड, अॅड. अरुण माळोदे यांनी केला. सरकारी पक्षातर्फे ॲड. राजेंद्र बघडाणे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर खरे याचा जामीन अर्ज फेटाळला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed