नांदेड : नांदेड महानगरपालिकेत गुंठेवारी प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा ईडी कार्यालयापर्यंत जाऊन पोहचला आहे. या प्रकरणात महापालिकेचे अधिकारी ईडीच्या रडारवर देखील आहेत. असं असताना देखील महापालिकेत गुंठेवारीसाठी आलेल्या मालमत्ता धारकांकडून मोठ्या प्रमाणात लाच घेतली जात आहे. मंगळवारी गुंठेवारी फाईल मंजूर करून देण्यासाठी पाच हजाराची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेच्या लिपिकास रांगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली. गजानन रामकिशन सर्जे असं अटक करण्यात आलेल्या लिपिकाचं नाव आहे.यातील तक्रारदाराने स्वतःच्या मालकीचा प्लॉट क्र ०४ गट नंबर ९९ तरोडा खु. नांदेड येथील मालमत्तेचे नियमाधीन गुंठेवारी मिळणवण्यासाठी दोन वर्षापूर्वी म्हणजेच नोव्हेंबर २०२१ मध्ये महापालिकेच्या गुंठेवारी विभागात अर्ज केला होता. परंतु त्यांच्या या अर्जावर गुंठेवारी विभागातील अधिकाऱ्याकडून कुठलीच दखल घेण्यात आली नाही. गुंठेवारी साठी सलग दोन वर्ष त्या मालमत्ता धारकाला महापालिकेत खेटे मारावे लागले होते. तरी ही गुंठेवारी काही मिळाली नाही. शेवटी तक्रारदाराने आरोपी लिपीक गजानन रामकिशन सर्जे यांना भेटून सदर गुंठेवारी फाईल लवकर मंजूर करून दयावी अशी विनंती केली. तेव्हा आरोपी गजानन सर्जे यांने तक्रारदारास पाच हजार रुपयाची लाच मागितली.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळाची शक्यता; ठाणेकर नागरिकांना सतर्कतेचा इशारासंबंधित लिपीक गजानन सर्जे यांच्या विरोधात तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो येथे तक्रार दिली. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एसीबीच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेत सापळा रचला आणि तक्रारदाराकडून लाच स्वीकारता आरोपीला अटक केली. या प्रकरणी वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईने महापालिकेत खळबळ उडाली आहे.
संतापजनक! ऑफिसात अल्पवयीन मुलीसोबत घाणेरडे कृत्य, ६८ वर्षीय सिनियर वकिलाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
गुंठेवारीसाठी मालमत्ताधारकांची लूट
फ्लॉट रजिस्ट्रीसाठी गुंठेवारी बंधनकारक करण्यात आली आहे. गुंठेवारी शिवाय फ्लॉटची खरेदी विक्री होतं नाहीये. त्यामुळे गुंठेवारी मिळवण्यासाठी नागरिक महापालिकेत गर्दी करीत आहेत. पण गुंठेवारी विभागातील अधिकारी याचा फायदा घेत मालमत्ता धारकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप आहे. नियमाने दहा ते वीस हजार रुपये गुंठेवारी शुल्क असताना देखील दुप्पट ते टिप्पत पैसे वसूल केले जातं आहे. आर्थिक पिळवणूक थांबवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जातं आहे.
एकेकाळी फूटपाथवर भजी, स्टेशनवर विकायचे साड्या, आज चांद बिहारी चालवतात कोट्यवधींचा व्यवसाय
गुंठेवारीच्या हजारो संचिका धूळ खात
महापालिकेत गुंठेवारीचे प्रकरण प्रलंबित आहे. गुंठेवारीचे प्रकरण निकाली न काढल्याने गुंठेवरीच्या हजारो संचिका परवानगी शिवाय धूळ खात पडून आहेत. अनेक तक्रारी वाढल्या असल्या तरी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली जात नाहीत.