• Wed. Sep 9th, 2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रा. चंद्रकांत चव्हाण यांचे उद्या व्याख्यान

ByMH LIVE NEWS

Jun 13, 2023
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रा. चंद्रकांत चव्हाण यांचे उद्या व्याख्यान

मुंबई, दि.13 : राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे महिला धोरण’ या विषयावरील सोलापूर जिल्ह्यातील वालचंद महाविद्यालयातील प्रा. चंद्रकांत चव्हाण यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून हे व्याख्यान बुधवार दि.14 जून 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

0000

जयश्री कोल्हे/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed