• Sun. Sep 22nd, 2024

नाद करायचा नाही! चक्क थार गाडीने नांगरली एक एकर शेती, शेतकरी अनिल तोंडेंची जोरदार चर्चा

नाद करायचा नाही! चक्क थार गाडीने नांगरली एक एकर शेती, शेतकरी अनिल तोंडेंची जोरदार चर्चा

इंदापूर, पुणे : सोशल मीडिया म्हटलं की नागरिक काहीही करण्यास तयार असतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने केलेला जुगाड सध्या चर्चेत आहे. शेतकऱ्याने चक्क थार गाडीने शेती नांगरल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या शेतकऱ्याच्या अनोख्या जुगाडाची चर्चा सुरू झाली आहे.सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामांमध्ये शेतकरी वर्ग व्यग्र आहे. यामध्ये कोणी बैल जोडी किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची नांगरत आहेत. मात्र लोणी देवकर येथील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खपू व्हायरल होत आहे. अनिल मधुकर तोंडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

पुणे विमानतळावर एक दोन नाही तर सात विमानांना उशीर, संतप्त प्रवाशांची थेट मंत्रालयाकडे धाव
थार गाडी ही युवकांचे मोठे आकर्षण आहे. ही गाडी खरेदी करण्यासाठी तब्बल एक वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. तेव्हा कुठेही गाडी खरेदीदाराला मिळते. कुस्तीमध्येही पैलवानांना थार गाडीची खास भेट दिली जाते. त्यात अनेक शेतकरीही थार गाडी घेताना पहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात दिसला ११ व्या शतकातील ऐतिहासिक प्राचीन खजिना, पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
अनिल तोंडे या युवा शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील नांगरणीसाठी या गाडीचा उपयोग केल्याने तालुक्यात त्यांच्या या अनोख्या कृतीची चर्चा रंगली आहे. त्यांनी जवळपास एक एकर क्षेत्र थार या गाडीच्या साह्याने नांगरले आहे.

एकच मागणं विठुराया, आम्हा तुझा विसर न व्हावा; हरिनामाच्या गजरात माऊली निघाले पंढरीला

‘गाडीला मागील बाजूस बैलाच्या साह्याने नांगरणी करणारा नांगर दाव्याच्या साहाय्याने जोडून नांगरणी केली. या दणकट गाडीच्या साह्याने आपण शेती नांगरणी करून पाहूया असा विचार मनात आल्याने त्यांनी जवळपास एक एकर क्षेत्राची नांगरणी करून पाहिली. ट्रॅक्टरच्या तुलनेत गाडीने नांगरट करण्यास अधिकचा खर्च आला. परंतु गाडीची कार्यक्षमता पडताळले असता ती किती दणकट आहे, हे समोर आले. यामुळे मी गाडीविषयी समाधानी आहे’, असे अनिल तोंडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed