• Sun. Sep 22nd, 2024

कालव्याच्या पाण्याचा प्रचंड वेग, पोहता येत नव्हते तरी मारली उडी, शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत

कालव्याच्या पाण्याचा प्रचंड वेग, पोहता येत नव्हते तरी मारली उडी, शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत

सातारा : खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील निरा उजव्या कालव्याच्या पाण्यात पोहण्यासाठी शाळकरी मुलाने पुलावरून उडी मारली. मात्र, पोहता नीट येत नसल्याने तो बुडाला. त्यातच कालव्यातील पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तो वाहून गेला. ही घटना आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. अनिकेत शंकर पवार (वय १४) असे त्याचे नाव आहे. शंकर पवार हे अपंग असून त्यांना हा एकुलता एकच मुलगा होता.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, लोणंद येथील अनिकेत शंकर पवार (वय १४, रा. लोणंद, ता. खंडाळा) हा दहावीत शिकत असलेला मुलगा शेजाऱ्याबरोबर पाडेगाव येथील निरा उजवा कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्याने लोणंद – निरा मार्गावर असलेल्या निरा उजवा कालव्याच्या पुलावरून पाण्यात उडी मारली. मात्र त्याला नीट पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खात पाण्याच्या मध्यभागी बुडाला.

Haircut: बापरे! केस कापण्यासाठी एवढं मोठं बिल, ते भरण्यासाठी घ्यावं लागलं कर्ज, किंमत जाणून धक्काच बसेल
पाण्याचा प्रवाह खूप असल्याने आणि किनार्‍यापासूनचे अंतर जास्त असल्याने त्याला वाचवता येणे शक्य झाले नसल्याचे आजूबाजूला असलेल्या लोकांनी सांगितले. त्यानंतर बराच शोध घेऊनही तो सापडला नसून संध्याकाळपर्यंत त्याचा शोध नातेवाईकांकडून सुरूच होता. नातेवाईकांनी खूप अंतरापर्यंत त्याचा शोध घेतला, पण तो सापडू शकला नाही.

Amravati: परतवाडा धारणी घाटात मोठा अपघात, ST बस दरीत कोसळली, सुदैवाने झाडांमध्ये अडकल्याने अनेकांचा वाचला जीव
या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कय्युम मुल्ला आणि पोलीस हवालदार विष्णू गार्डे यांनी घटनास्थळाला भेट देऊन वाहून गेलेल्या मुलाला स्थानिकांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना संध्याकाळपर्यंत यश आले नाही. उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

हे माझ्या समजण्यापलीकडचे, सचिनने WTC फायनलमधील पराभवानंतर घेतला टीम इंडियाचा क्लास
लोणंद येथील शंकर पवार हे अपंग असून अनिकेत हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. आपल्या मुलाबाबत झालेल्या घटनेनंतर पवार यांनी आक्रोश केला. या घटनेनंतर घटनास्थळी नातेवाईक व बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed