Chhatrapati Sambhajinagar Accident Student Death : मनस्वीच्या आईला अचानक चक्कर आल्याने त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र त्याचवेळी हायवा चालकाने मागे न पाहता रिव्हर्स घेतल्याने आक्रित घडलं
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मनस्वी ही कुटुंबासह हिरापूर येथे राहते. तिचे वडील हॉटेलमध्ये काम करतात. मनस्वीचे वडील आजारी असल्याने चिकलठाणा येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. मंगळवारी सकाळी मनस्वी आपल्या आईसोबत दुचाकीवरून वडिलांना डबा देण्यासाठी निघाली होती. हिरापूर परिसरात आल्यावर मनस्वीच्या आईला अचानक चक्कर आल्याने त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र, त्याचवेळी महापारेषणच्या कामावर असलेल्या एका विनाक्रमांकाच्या हायवा चालकाने मागे न पाहता रिव्हर्स घेतला. या भीषण धडकेत मनस्वी हायवाच्या चाकाखाली आली. स्वतःच्या डोळ्यासमोर पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेत जाताना पाहून आईने हंबरडा फोडला.
सुट्टीत फिरायचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील १० बजेटफ्रेंडली ठिकाणांची यादी
१८ किलोमीटरची फरफट अन् उपचाराचा विलंब
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या मनस्वीला तातडीने उपचाराची गरज होती. स्थानिक नागरिकांनी तिला हिरापूरपासून ११ किमी अंतरावरील चिश्तिया चौकातील एका खाजगी रुग्णालयात नेले. तसंच, या अपघातानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापारेषणच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या या हायवावर कोणताही क्रमांक नव्हता. अपघात घडल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी हायवावरील जुना क्रमांकही पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
Indore Fire : इलेक्ट्रिक कार चार्ज करताना आग, एकामागून एक सिलेंडर फुटले, कुटुंबातील सात जणांचा मृत्यू, डिजिटल लॉकमुळे कोंडी
तीन तास ठिय्या अन् पोलिसांत गुन्हे
मनस्वीच्या मृत्यूची बातमी समजताच संतप्त हिरापूरवासीयांनी आणि नातेवाईकांनी चिकलठाणा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. महापारेषणचे अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई होईपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. अखेर, पोलिसांनी हायवा चालक, महापारेषण आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. हेड कॉन्स्टेबल सुनील सुरसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Pune Friends Death : लेह-लडाखहून परत येताना काळाचा घाला, पुण्यातील तीन मित्रांचा अपघाती अंत, विमानाने परतलेला दोस्त धक्क्यात
मनस्वीचे ‘सीईटी’चे स्वप्न अधुरेच
मनस्वी अभ्यासात अत्यंत हुशार होती. नुकतीच तिची बारावीची परीक्षा संपली होती आणि ती पुढील शिक्षणासाठी ‘सीईटी’ परीक्षेची तयारी करत होती. वडिलांच्या आजारपणात कुटुंबाला सावरणारी ही लेक अचानक सोडून गेल्याने गाडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
