गेल्या काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरला दंगलीत सामना करावा लागला. काही तरुणांकडून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आणि कोल्हापूर बंदची हाक देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. यासाठी हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले आणि आंदोलनाला सुरुवात केली मात्र काही वेळातच हे आंदोलन चिघळलं आणि आंदोलनाचे रूपांतर दंगलीमध्ये झाल. आक्रमक झालेले कार्यकर्ते कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते काही युवकांनी तर थेट दगडफेक करत मोडतोड करण्यास सुरूवात केली. यामध्ये रोज काम करून आपले घर चालवणारे इकबालभाईंच्या कपबशीच्या गाडीचे नुकसान झाले. कपबश्यानी भरलेली हातगाडी काहीजणांनी मोडतोड करत उलटवून लावली. यानंतर काही वेळात पोलिसांनी दंगलीवर नियंत्रण तर मिळवल पण नुकसान ही मोठ्या प्रमाणात झाले होते अनेक माध्यमात फोटो छापून आले अनेक ठिकाणी नुकसानीचे बातम्या ही लागल्या.
दुसऱ्या दिवशी बातमी वाचत असताना कोल्हापुरातील मिलिंद यादव यांना आपल्या शाळेतील मित्राची म्हणजे इकबालच्या हातगाडीची तोडफोड झाल्याची दिसली अणि मन सुन्नं झालं.खरंतर कोल्हापूर म्हणजे शाहू महाराजांचा विचार जपणारी नगरी येथे शाहू महाराज, कॉम्रेड गोविंद पानसरे, एन डी पाटील यांनी समाजासाठी अनेक चांगली कामे केली शिकवण दिली आणि हाच विचार घेऊन मिलिंद यादव यांनी आपल्या मित्राचा व्यवसाय पुन्हा उभा करायचा ठरवला आणि फोन केला मात्र तो आपला संसार सावरण्यासाठी हातगाडी दुरुस्तीसाठी घेऊन गेला होता. आणि विशेष म्हणजे त्याची गाडी ही एक हिंदूच दुरुस्त करत होता ज्याचा या घडलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. सायंकाळी मिलिंद यांनी पुन्हा पत्नी व मुलीसह इकबाल यांचे घर गाठले आणि आवश्यक तेवढी मदत करत कर्तव्य बजावले.त्यांनी समाजतून लोक लांब होत असल्याने पुन्हा एकत्र अन्यासाठी पोस्ट शेअर केली आणि बघता बघता पोस्ट जोरदार व्हायरल ही झाली. परिणामी अशा नुकसानग्रस्त विक्रेते, फेरीवाले, व्यापाऱ्यांसाठी समाजातूच आता मदतीचे नव्हे, तर कर्तव्याचे हात पुढे येऊ लागले आहेत.
राजर्षी शाहू महाराज, गोविंद पानसरे यांचे विचार प्रत्यक्ष रुजायला हवेत आणि ते कृतीतून पुढच्या पिढीपर्यंत पोचायला हवेत, याचसाठी मी हे कर्तव्य बजावले. यात माझा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसून समाजातील एकोपा आणि चांगुलपणा टिकायला हवा यासाठी मी ही मदत केली आणि पोस्ट ही केली, अशी प्रतिक्रिया मिलींद यादव यांनी व्यक्त केली.