• Sat. Sep 21st, 2024

पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी विवाहितेचा अजब फंडा; पोलीस पुण्याहून दिल्लीला, चौकशीत कळालं वेगळंच

पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी विवाहितेचा अजब फंडा; पोलीस पुण्याहून दिल्लीला, चौकशीत कळालं वेगळंच

म. टा. प्रतिनिधी, पुणे : प्रेम संबंधातून २२ वर्षीय मैत्रिणीला दिल्लीला पळवून नेऊन तिच्या प्रियकराने तिला तेथे डांबून ठेवल्याची तक्रार देणाऱ्या तरुणीने, केवळ पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी खोटी तक्रार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणी पोलिस नियंत्रण कक्षाकडे करीत असलेल्या तक्रारीची पोलिस दखल घेत नव्हते, त्यामुळे तिने मैत्रिणीच्या नावे खोटी तक्रार दिली.काय आहे प्रकरण?

‘आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून २२ वर्षाच्या मैत्रिणीला दिल्लीला पळवून नेले असून, तिला तेथे डांबून ठेवले आहे. तिने तेथील लोकेशन पाठविले आहे,’ अशी तक्रार एका तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात केली होती. तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे व त्यांच्या पथकाने या तरुणीचा शोध सुरू केला. पोलिसांची तपास पथके तातडीने दिल्लीला रवाना झाली. त्यांनी तांत्रिक विश्लेषणातून संबंधित तरुणी आणि तिच्या प्रियकराचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणीने आपले अपहरण झाले नसून, असा कोणताही प्रकार नसल्याचे पोलिसांना सांगितल्याचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले.

या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आल्यानंतर खोटी तक्रार देणारी तरुणीदेखील दिल्लीला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने तरुणीचा दिल्लीत शोध घेऊन तिला ताब्यात घेतले.
Mumbai : घरी आलेल्या आईला ती कुठे आहे, हे सांगता येईना, पोलिसांची ३६ तासांची अविश्रांत शोधमोहीम, अखेर…
अद्दल का घडवायची होती?

पुण्यात पोलिसांकडे तक्रार देणारी तरुणी विवाहित असून, नवऱ्यापासून विभक्त राहते. लग्नापूर्वी तरुणीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तो तिला सातत्याने त्रास देत होता. त्यामुळे तिने पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली होती. मात्र, पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ती पोलिसांवर चिडली होती. तक्रारीवर पोलिसांचा विश्वास बसावा म्हणून तिने दिल्लीतील मैत्रिणीला काही न सांगता तिचे लोकेशन मागवून घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed